बांगर्डे गावच्या सरपंचपदी माधुरी भाऊ दडस यांची बिनविरोध निवड…
बांगर्डे (बारामती झटका)
बांगर्डे ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. माधुरी भाऊ दडस यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अध्यासी अधिकारी तथा मंडल अधिकारी फोंडशिरस सी. बी. लोखंडे यांनी केली.
बांगर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. द्वारकाबाई मोहन दडस यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त सरपंच पदाची निवडणूक सोमवार दि. 07/10/2024 रोजी बांगर्डे ग्रामपंचायत कार्यालयात अध्यासी अधिकारी तथा मंडल अधिकारी फोंडशिरस सी. बी. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा ग्रामपंचायत सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी श्री. हनुमंत वगरे यांनी काम पाहिले तर सहकार्य तलाठी अभंग भाऊसाहेब यांनी केले.
सौ. माधुरी भाऊ दडस यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आलेला होता, यावेळी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान उपसरपंच श्री. अमोल दादा वाघमोडे, मावळत्या सरपंच सौ. द्वारकाबाई मोहन दडस, माजी सरपंच सौ. अश्विनी शंकर मेटकरी, माजी उपसरपंच श्री. नरहरी तुकाराम चव्हाण हे पाच ग्रामपंचायत सदस्य कार्यालयामध्ये उपस्थित होते. निवडणुकीची बिनविरोध प्रक्रिया पार पडली. त्यावेळेस ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत मदने, महिपती दडस साहेब, काळे गुरुजी, शंकर मेटकरी, माजी सरपंच अशोक दडस सर, मोहन दडस, ज्योतीराम दडस, अक्षय अशोक वाघमोडे, मदने वकील, आबा मेंबर, नाथा दडस, चेअरमन मोहन मिटकरी, राजू मोहिते, गणेश केंगार, अध्यक्ष बाळू वाघमोडे, रामदास वाघमोडे, महादेव टेळे, प्रकाश वलेकर, मोहन वाघमोडे, महादेव वाघमोडे, दत्तू दडस, ज्योतीराम दडस, आत्माराम दडस, सोमा वाघमोडे, अक्षय दडस, अरुण दडस आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Anında takipçi SEO optimizasyonu, dijital pazarlama stratejimizi güçlendirdi. http://royalelektrik.com/esenyurt-elektrikci/
great articlesitus toto Terpercaya
LINK SITUS SLOT GACOR SERVER THAILAND 2024 SCATTER HITAM LNK DAFTAR
Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to more added agreeable from you By the way how could we communicate
nagano tonic: nagano tonic
Wow that was odd. I just wrote an very long comment
but after I clicked submit my comment didn’t show up.
Grrrr… well I’m not writing all that over again. Anyhow, just wanted to say wonderful blog!