“बारामती झटका इफेक्ट” अकलूज नगरपरिषद खडबडून जागी झाली, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली…

मेहुणी, बायको आणि मिंदा संसार, अशी दयनीय अवस्था अकलूज नगर परिषदेची झालेली आहे. या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती….
अकलूज (बारामती झटका)
मेहुणी, बायको आणि मिंदा संसार, अशी दयनीय अवस्था अकलूज नगर परिषदेची झालेली आहे, अशा मथळ्याची बातमी बारामती झटका ने प्रसिद्ध केलेली होती. त्यामुळे अकलूज नगर परिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे होऊन आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. बारामती झटका वृत्ताची दखल घेऊन काम सुरू झाल्याने वाहनधारक व परिसरातील नागरिकांमध्ये बारामती झटका इफेक्ट अशी चर्चा सुरू आहे.
बारामती झटका यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये, आशिया खंडात एक नंबर सर्वात मोठी समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायत होती. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर व्हावे यासाठी अनेक दिवस अकलूज, माळेवाडी नागरिकांनी साखळी उपोषण केलेले होते. नागरिकांच्या उपोषणाला यश येऊन अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. मात्र, हौसेने केला पती आणि त्याला झाली रगतपिती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अकलूज नगरपरिषदेला कोट्यावधी रुपयाचा निधी येतोय मात्र, कोणत्या घुशीच्या बिळात जातोय, याचा अंदाज सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला लागत नाही. नगरपरिषद होऊन कितीतरी महिने लोटले तरीसुद्धा नगरपरिषदेची निवडणूक झालेली नसल्याने प्रशासनावर कोणाचाच निर्बंध नाही मात्र, अपवादात्मक लोकप्रतिनिधी यांच्या मिलीजुली कारभारामुळे नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या नशिबी घोर निराशा आलेली आहे. गावांमधील अंतर्गत रस्ते, गटारी स्वच्छता यांचे तीन तेरा वाजलेले आहेत. अशी दयनीय अवस्था अकलूज नगर परिषदेची झालेली आहे. मेहुणी, बायको आणि मिंदा संसार, अशी दयनीय अवस्था पहायला मिळत आहे. उपोषण करून अकलूज ग्रामपंचायतीची नगरपरिषद केली आणि खऱ्या अर्थाने हौसेने केला पती आणि त्याला झाली रगतपिती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अकलूज नगर परिषद हद्दीमध्ये अनेक ठिकाणी गटारींची अवस्था व दुर्दशा जर पाहिली तर निश्चितपणे आदिवासी भागात आहोत काय, अशी जाणीव होत आहे. चेहरा स्वच्छ व अंगाची दुर्गंधी अशी अकलूज नगर परिषदेची अवस्था झालेली आहे. एक दोन रस्ते सोडले तर बाकीच्या रस्त्याने प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था झालेली आहे.
अकलूज उपविभागीय कार्यालय व अकलूज पोलीस उपविभागीय कार्यालय अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बायपास वरून जात असताना गटारीवर खड्डा पडलेला आहे. प्रशासन कोणाचा तरी बळी जाण्याची वाट पाहत आहे का, अशी नागरिकांमध्ये कुजबूज सुरू आहे. घोडीला घोडा लावण्याचे काम नगरपरिषद करीत आहे. त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडलेला होता. त्या ठिकाणी जाळी बसवलेली आहे. विशेष म्हणजे जाळीच्या बाजूनी आत मोठा खड्डा पडत चाललेला आहे. त्या ठिकाणाहून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध महिला, पुरुष, क्रीडा संकुलकडे व्यायामासाठी त्याच रस्त्याने जात आहेत. सदरच्या रस्त्यावर नगरपरिषदेने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी सुज्ञ नागरिकांमधून मागणी होत आहे. तर अनेक सामाजिक संघटना आंदोलन व उपोषण करण्याच्या विचाराधीन आहेत. अशी बातमी प्रसारित केलेली होती. दोनच दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. बारामती झटका परिवार यांचे कडून अकलूज नगर परिषद यांनी काम सुरू केल्याबद्दल नगरपरिषदेच्या प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.