ताज्या बातम्यासंपादकीयसामाजिक

बारामती झटका परिवारातील नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक, वाचक, प्रेक्षक यांचे आभार – संपादक श्रीनिवास कदम पाटील.

मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, मा. आ.राम सातपुते, युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक चाहत्यांचा वाढदिवसाला शुभेच्छांचा पाऊस….

माळशिरस (बारामती झटका)

दि. 2 सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस असतो. त्या दिवशी बारामती झटका परिवारातील नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक, वाचक, प्रेक्षक यांनी वाढदिवसाला सोशल मीडियामधून शुभेच्छा दिलेल्या आहेत. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. राम सातपुते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, नगरपंचायतीचे आजी-माजी नगरसेवक, साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघाचे आजी माजी संचालक, विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, विविध राजकीय पक्षांचे व विविध सामाजिक संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी, समाजातील प्रतिष्ठित इंजिनियर, वकील, प्राध्यापक डॉक्टर, शिक्षक, नोकरदार, विविध विभागाच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी व शेती व्यवसायामध्ये काम करणारा मजूर वर्ग यांच्यासह सर्वसामान्य व गोरगरीब जनतेने वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पाडलेला होता. सर्वांचे मनापासून हृदयातून अंतकरण पूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे.

वाढदिवसाला फेटा, शाल, हार, गुच्छ, श्रीफळ यांचा वायफळ खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्याकरता गेल्या तीन वर्षापासून अर्थपूर्ण शुभेच्छांची संकल्पना सुरू केलेली होती. यंदाचे चौथे वर्ष आहे. मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक, प्रेक्षक व वाचक यांनी उदंड प्रतिसाद देऊन 101 रुपयापासून 10,000 हजार रुपये पर्यंत अर्थपूर्ण शुभेच्छा दिलेल्या आहेत.

सोशल मीडिया बदलत गेला, त्यामुळे बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर केले. बारामती झटका वेब पोर्टल वाचणाऱ्या वाचकांची संख्या तीन कोटींच्या आसपास गेलेली आहे तर, बारामती झटका यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची दीड कोटींच्या आसपास गेलेली आहे. बारामती झटका यूट्यूब चॅनलची एक बातमी 30 लाख 40 हजार पर्यंत गेलेली आहे. साठ हजार प्रेक्षकांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे.

बारामती झटका वेब पोर्टल व युट्युब चॅनलची समाजामध्ये वाटचाल सुरू असताना 90% लोकांची सहकार्याची भावना आहे तर बोटावर मोजणारे 10% लोक टीका टिप्पणी करीत असतात. मात्र, टीका टिपणीला उत्तर न देता बारामती झटका न्यूज चॅनलची खडतर रस्त्याने सुद्धा दमदार वाटचाल हितचिंतकांमुळे सुरू आहे. ग्रामीण भागातील न्यूज चॅनल असल्याने त्यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कुस्ती, ग्रामीण भागातील सण, उत्सव, लग्न समारंभ, वाढदिवस, पुण्यस्मरण, जागरण गोंधळ, अशा बातम्यांना प्राधान्य देऊन बारामती झटका न्यूज चॅनलची वाटचाल भविष्यातही अशीच सुरू असणार आहे. टीकाटिपणी, मान-अपमान अशा गोष्टींकडे लक्ष न देता हितचिंतक, वाचक, प्रेक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या सहकार्याने पुढील वाटचाल जोमाने सुरू राहणार असून तळागाळातील वंचित, शोषित व पिडीत जनतेबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असून बारामती झटका संपादक या नात्याने भविष्यात कार्य करत राहणार आहे.

जनमानसात आपली काय प्रतिमा आहे, याची प्रचिती वाढदिवसाला आलेली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, लहान मुले, विविध चॅनेलचे संपादक, दैनिक व न्यूजचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव यांनीही मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवस दोन तारखेला होता तिन मोबाईल दिवसभर खणानत होते. गौराई गणपतीचे दिवस असल्याने घाई गडबड होती काही हितचिंतकांनी तीन तारखेला सुद्धा फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजामध्ये आपणाला सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा एवढा प्रतिसाद असेल तर कायम जनतेच्या पाठीशी पत्रकारितेच्या माध्यमातून वंचितांचा आवाज म्हणून राहणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून ऋणनिर्देश व्यक्त करून आपल्या शुभेच्छा कायम पाठीशी राहाव्यात संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील उर्फ निवास काका अशी आशा व्यक्त करतो.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom