बारामती झटका वृत्ताने शेतकऱ्याला न्याय मिळणार…

मांडवे (बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस, येथील घनश्याम ज्ञानदेव आद्रट यांच्या शेतातील कारल्याचे पीक दुकानदाराने दिलेल्या चुकीच्या औषधाच्या डोसमुळे जळून खाक झाले आहे. त्या संदर्भात घनश्याम आद्रट यांनी माळशिरस तालुका कृषी अधिकारी यांना सदर दुकानदार आणि इको पॉइंट ॲग्रो सर्विस सेंटर, नातेपुते यांच्यावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याबाबत तक्रारी अर्ज दिला होता.
दुकानदाराने Reap Hotshot, SRPM Strawberry, Ayushi Glamour या औषधांची कारल्याच्या पिकावर फवारणी करण्यास सांगितले. त्यानुसार पीडित शेतकरी ज्ञानदेव आद्रट यांनी या औषधांची फवारणी केली. त्यानंतर कारल्याचे पीक जळून गेले. त्यामुळे घनश्याम आद्रट यांनी सदर कंपनी विरुद्ध आणि दुकानदाराविरुद्ध कारवाई करून मोबदला मिळण्यासाठी माळशिरस तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज केल्याची बातमी बारामती झटका न्यूज चॅनलने प्रसारित केली होती.


या पार्श्वभूमीवर घनश्याम आद्रट यांनी माळशिरस तालुका कृषी अधिकारी यांना तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या प्रक्षेत्र भेटीबाबत निवेदन दिले आहे. सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शासन परिपत्रकानुसार कृषी निविष्ठा बाबत तालुकास्तरावर प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून समाविष्ट केले आहेत. त्यानुसार घनश्याम आद्रट यांनी कारले पिकाबाबत दि. २३/५/२०२४ रोजी या कार्यालयाकडे तक्रारी अर्ज सादर केला आहे. तरी सदर तक्रार अर्ज तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची प्रक्षेत्र भेट आयोजित करून निकाली काढणे आवश्यक आहे. तरी दि. ५/८/२०२४ रोजी दुपारी २ वा. प्रक्षेत्र भेट आयोजित केली आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या सदर प्रक्षेत्र भेटी करिता कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी सदस्य म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी दि. ५/८/२०२४ रोजी दुपारी २ वा. मौजे मांडवे येथील घनश्याम आद्रट यांच्या प्रक्षेत्रावर उपस्थित राहावे अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.