इकबाल काझी यांचे अधीक्षक अभियंता पुणे यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय…

जलसंपदा विभागात 45 वर्ष प्रशिक्षण पूर्ण झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी पदावर समावेशन करून आश्वासित प्रगती योजनेचे त्या पदावरील सर्व लाभ मिळण्यापासून वंचित आहेत
माळशिरस (बारामती झटका)
जलसंपदा विभागात 45 वर्ष पूर्ण झालेले प्रशिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी या पदावर समावेश करून आश्वासित प्रगती योजनेचे व त्या पदाचे सर्व लाभांपासून वंचित असणारे श्री. इकबाल यासीन काझी यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना आत्मदहन नोटीस देऊन कळविलेले आहे. वरील प्रकरणास कंटाळून दि. २६/०१/२०२४ रोजी प्रजासत्ताक दिनादिवशी अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय, पुणे यांचे दालनासमोर आत्मदहन करणार आहेत.
याची नोंद घेऊन सदरच्या आत्मदहनास अधीक्षक अभियंता पुणे व लिपिक घुले हे सर्वस्वी जबाबदार राहतील असे निवेदन दिलेले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त पुणे, उपविभागीय अधिकारी पुणे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, सिंचन भवन अधीक्षक अभियंता व संचालक मंडळ संशोधन व विकास संचनालय पुणे अध्यक्ष अभियंता पुणे पाटबंधारे मंडळ सिंचन भवन व माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना दिलेल्या आहेत.
सदरच्या निवेदनामध्ये श्री. इकबाल यासीन काझी सचिव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक क्षेत्रीय कर्मचारी संघटना पुणे जिल्हा यांनी नमूद केलेले आहे कि, वरील विषयाबाबत मागणी करून अनेक महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्याप अधीक्षक अभियंता पुणे यांच्याकडून कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्वरित कारवाई करणेबाबत मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्याकडून कळवून देखील मंडळ कार्यालयाने कुठलीही दखल घेतलेली नाही. याबाबत अधिक्षक अभियंता पुणे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता संबंधित लिपिक श्री. घुले यांना याबाबत त्वरित कारवाई करणे बाबत सूचना देऊन सुद्धा संबंधित लिपिक नाहक विलंब करून अडवणूक करीत असल्याचे दिसत आहे. वेळोवेळी फोनवरून चौकशी केली असता फोन घेत नाहीत. तसेच प्रत्यक्ष भेट घेतली असता तुमचे काम झाले आहे, थोडे राहिले आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. वरील लाभ मला माझे सेवाकाळातच मिळणे आवश्यक्य होते.
परंतु, याबाबत मंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालयाने खूपच अन्याय केलेला आहे. तसेच संबंधित लिपिक श्री. घुले हे टाईमपास करीत आहेत. संबंधित लिपिकाच्या ताब्यात विषयांकित प्रस्ताव मिळाल्यानंतर आठ दिवसात त्यावर अंतिम कारवाई होणे आवश्यक असते. असे न झाल्याने अधीक्षक अभियंता यांचे दालनासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन पीडित कर्मचारी यांनी दिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.