बारावीचा निकाल तर लागला आता, 10 वीचा निकाल कधी लागणार ?

पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी चा निकाल अखेर ५ मे २०२५ रोजी जाहीर झाला. फेब्रुवारी २०२५ ते मार्च २०२५ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा १२ वीचा निकाल हा लवकर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता १० वीचा निकाल देखील लवकरच जाहीर होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता १० वीच्या परीक्षेचा निकाल हा १५ मे पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. मागील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये, बारावीचे निकाल २१ मे रोजी आणि दहावीचे निकाल २७ मे रोजी जाहीर झाले.
लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा ही पुढील आठवड्यात संपू शकते. बारावीच्या निकालाची तारीख ही 4 मार्च जाहीर करण्यात आली होती. ज्यानंतर 5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे १० वीच्या निकालाची नेमकी तारीख देखील आदल्या दिवशीच जाहीर केली जाईल.
गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर, साधारणपणे महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. पण यंदापासून हे निकाल लवकरच जाहीर करण्याचं बोर्डाचं धोरण आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.