बार्शी येथील सौ. उषा निपाणीकर यांचे वृद्धापकाळाने निधन
बार्शी (बारामती झटका) अनिल देशपांडे यांजकडून
बार्शी येथील सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल येथील सेवानिवृत्त शिक्षिका सौ. उषा पांडुरंग निपाणीकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्या वय ८२ वर्षांच्या होत्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय सदस्य श्री. पांडुरंग निपाणीकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती श्री. पांडुरंग निपाणीकर, २ मुली, १ मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
सौ. उषा निपाणीकर विद्यार्थ्यांच्या प्रिय शिक्षिका होत्या. त्यांच्यावर आज दुपारी ०५.३० वाजता वैकुंठभूमी, ताडसौदणे रोड, बार्शी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो आणि निपाणीकर परिवारास या दु:खातून सावरण्याचे बळ देवो…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील 9850104914 हा नंबर समाविष्ट करावा..