बार्शीत सर्व वयोगटातील नागरिकांसाठी नाट्य शिबिराचे आयोजन…..

बार्शी (बारामती झटका)
भाग्यकांता संचलित शब्दरंग तर्फे या वर्षी बार्शीमध्ये प्रथमच सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी अत्यंत व्यवसायिक, अभ्यासू व तज्ञ पातळीचे नाट्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात अभिनयासह नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी संयोजन, रंगभूषा, वेशभूषा, संवाद कौशल्य या सर्व बाबींचे प्रशिक्षण देण्यात येईल. शिबिराच्या शेवटी शिबिरार्थीकडून एक एकांकिका देखील सादर करून घेतली जाईल. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि 8 वर्षापुढील लहान मुले, मुली असे सर्वजण यामध्ये सहभागी होऊ शकतात.
या शिबिरामध्ये डॉ. श्री. किरण लद्दे यांचे मार्गदर्शन शिबिरार्थीना लाभणार आहे. डॉ. किरण लद्दे यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी इन ड्रामाटिक्स मिळालेली असून ते मास्टर ऑफ परफॉर्मनिंग आर्ट स्पेशलायजेशन प्रोडक्शन आणि डायरेक्शन ही पदवी प्राप्त केलेले अत्यंत तरुण दिग्दर्शक आहेत. महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद तसेच अनेक बालनाट्य, महिला नाट्य स्पर्धामध्ये त्यांनी दिग्दर्शनासाठी असंख्य वेळा प्रथम पारितोषिके जिंकली आहेत. त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तर्फे श्री. बापू पेंढारकर स्मृती पुरस्कार यासोबत अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

तसेच या शिबिरासाठी उपलब्ध असणारे दुसरे मार्गदर्शक म्हणजे डॉ. मयूर तिरमाखे, जे कोपरगाव येथे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली आहेत. नुकताच त्यांनी स्वतः दिग्दर्शीत केलेला, सिद्धार्थ जाधव अभिनीत पहिला मराठी चित्रपट लग्न कल्लोळ बॉक्स ऑफिसवरती यशस्वी ठरला आहे. त्यासोबतच या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणारे तिसरे प्रशिक्षक हे बार्शीमधील सुप्रसिद्ध अभिनेते श्री. अभय चव्हाण हे आहेत. अभय चव्हाण यांनी आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या असून अनेक अल्बममध्ये देखील काम करून या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
हे शिबीर दि. ११ मे ते दि. १८ मे पर्यंत घेण्यात येणार असून त्याची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. सदरचे शिबीर सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे घेण्यात येणार आहे. यासाठीचे शुल्क केवळ रुपये १५०० आकारण्यात येणार आहे. तरी उत्सुक व्यक्तींनी अधिक माहिती साठी डॉ. श्री. कैवल्य गायकवाड आणि डॉ. सौ. तनुजा चिकणे यांच्याशी 9423560600 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.