भगवंत मंगल कार्यालयातून सात तोळे सोने व एक लाख रुपये रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
वधू आणि वर यांच्या आई-वडिलांनी अनोळखी व्यक्ती खोलीत आढळल्यास चौकशी करणे गरजेचे आहे.
पुरंदावडे (बारामती झटका)
भगवंत मंगल कार्यालय, जाधववाडी रोड, पुरंदावडे सदाशिवनगर येथील मंगल कार्यालयात श्री. विष्णू नारायण सिद यांची कन्या चि. सौ. कां. श्वेताली सिद यांच्या मातोश्री साडी बदलत असताना अज्ञात चोरट्यांनी नववधू व वरमाई यांचे सात तोळे दागिने व एक लाख रुपये रक्कम असणारी बॅग लंपास केलेली आहे.
चि. विक्रम टेळे, सिदाचीवाडी व चि. सौ. कां. श्वेताली सिद, सिदाचीवाडी आणि चि. चैतन्य टेळे व चि. सौ. कां. प्राजक्ता ठवरे, खुडूस यांचा शुभविवाह भगवंत मंगल कार्यालय, सदाशिवनगर नजीक, जाधववाडी रोड येथे मंगळवार दि. 28/11/2023 रोजी दुपारी एक वाजून पाच मिनिटे या शुभमुहूर्तावर होता. हळदी समारंभ सोमवार दि. 27/11/2023 रोजी रात्री नऊ वाजता कार्यालयातच संपन्न झालेला होता. मंगळवारी लग्नाच्या दिवशी न्याहारी रुखवत मांडण्याचे काम सुरू होते. चि. सौ. कां. श्वेताली हिचा मेकअप दहा वाजता सुरू होता. तीच्या मातोश्री साडी बदलत असताना त्यांच्या जवळील बॅग बाजूला ठेवलेली होती. पाच मिनिटात साडी बदलण्याचे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, सोने व पैसे असणारी बॅग गायब झालेली आहे. त्यामध्ये दोन मोबाईल होते. शोधाशोध केली, परंतु बॅग सापडली नाही. पोलीस स्टेशन येथे संपर्क करून मोबाईल नंबर वर ट्रेकिंग केले असता नातेपुतेकडे लोकेशन दाखवत होते. पोलिसांची शोधा शोध सुरू आहे. सीसी कॅमेरे चेक केले जात आहेत. नातेपुतेवरून चोरटे जात असताना त्यांनी बॅगेमध्ये मोबाईल व दागिन्याचे मोकळे बॉक्स टाकून दागिने व रोख रक्कम घेऊन गेलेले आहेत.
लग्नकार्यातील वधू आणि वर यांच्या आई वडिलांनी अनोळखी व्यक्ती खोलीत आढळल्यास चौकशी करणे गरजेचे आहे. एक अनोळखी महिला इतरत्र फिरत होती. त्यावेळेला चौकशी केली असती तर पुढील अनर्थ टळला असता. यासाठी वधूंच्या आईवडिलांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कार्यालयात सीसी कॅमेरे बसवणे काळाची गरज आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.