भाजप १०, शिवसेना ६, राष्ट्रवादी ६ हे २२ आमदार घेतील मंत्रीपदाची शपथ…

मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र विधानसभेतील २२ आमदार हे ५ डिसेंबर रोजी मंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपाल रमेश बैस हे त्यांना मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
मंत्रीपदाची शपथ घेणारे मंत्री पुढीलप्रमाणे :-
भाजप
१) देवेंद्र फडणवीस (नागपूर)
२) राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी)
३) चंद्रशेखर बावनकुळे (कामठी)
४) सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर)
५) गिरीष महाजन (जामनेर)
६) मंगलप्रभात लोढा (मलबार हिल)
७) आशिष शेलार (वांद्रे),
८) चंद्रकांतदादा पाटील (कोथरूड)
९) शिवेंद्रराजे भोसले (सातारा)
१०) प्रशांत बंब (गंगापूर)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट)
११) अजित पवार (बारामती)
१२) हसन मुश्रीफ (कागल)
१३) धनंजय मुंडे, (परळी)
१४) छगन भुजबळ (येवला)
१५) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव)
१६) आदिती तटकरे (श्रीवर्धन),
शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
१७) एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखडी)
१८) शंभुराजे देसाई (पाटण)
१९) उदय सामंत (रत्नागिरी)
२०) भरतशेठ गोगावले (महाड)
२१) दादा भुसे (मालेगाव)
२२) संजय शिरसाठ
वरील २२ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. अहमदनगर जिल्ह्यातील दहाजण महायुतीतील घटक पक्षाकडून निवडून आलेले आहेत. दहाही जण मंत्रीपदाच्या शर्यतीत होते परंतू विखे पाटील यांनी मंत्री पदासाठी बाजी मारून इतर आमदारांचा मंत्रीपदासाठीचा सस्पेन्स कायम ठेवून अहमदनगर जिल्ह्यातील किंगमेकर ठरले आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने शपथविधीसाठी उपस्थित राहणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या यादीत अचानकपणे किरकोळ फेरबदल करण्यासाठी काहीजण पडद्याआडून सुञ फिरवुन आपले नाव मंत्रीमंडळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना कितपत यश येते, हे शपथविधीच्या वेळी दिसून येणार आहे.
(बातमी करेपर्यंत ही यादी बरोबर होती.)

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
BWER Company stands as a trusted name in Iraq’s weighbridge industry, offering innovative designs, reliable installations, and comprehensive support for all weighing requirements.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/