ताज्या बातम्याराजकारण

भाजप महायुतीला डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना सोबत न घेतल्याने अकलूज नगर परिषद निवडणुकीत किंमत मोजावी लागणार का…

अकलूज नगर परिषद निवडणुकीत महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दोन्ही गट एकत्र तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा गट स्वतंत्र लढत आहे…

अकलूज (बारामती झटका)

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच अकलूज नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. अकलूज नगर परिषद निवडणुकीत महायुती सरकारमधील भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही गट एकत्र लढत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा गट स्वतंत्र लढत आहे. अकलूज नगर परिषदेमध्ये भाजप व महायुतीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना सोबत न घेतल्याने अकलूज नगर परिषद निवडणुकीत भाजप महायुतीला किंमत मोजावी लागणार का ? अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

अकलूज ग्रामपंचायत असताना एक हाती सत्ता केंद्र असणारे शिवरत्नवरील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समवेत घेतलेले आहे. तर भाजप व महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा भाजप व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे दोन गट एकत्र निवडणूक लढवत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील करीत आहे.

अकलूज नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याअगोदर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतलेली होती. दोनच दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील व अजितदादा यांचे विश्वासू सहकारी सुरेशआबा पालवे पाटील यांच्या उपस्थितीत पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील व उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. त्याच दिवशी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म मोहिते पाटील परिवाराकडे सुपूर्त केलेले होते.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर धवलदादा कोणत्या पक्षात जातील, याची उत्सुकता व राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. धवलदादा यांचे जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून जनसेवा संघटनेच्या माध्यमातून राजकारण व समाजकारण सुरू होते. संघटनेबरोबर राजकीय पक्षाची झालर असावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. कार्यकर्त्यांसाठी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी महायुती सरकारमधीलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी असणाऱ्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला होता.
अकलूज नगर परिषदेत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटाला भाजप व महायुतीमध्ये सोबत न घेतल्याने अकलूज नगर परिषद निवडणूकीत खऱ्या अर्थाने किंमत मोजावी लागणार का ?, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत आहे आणि होणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांनी जनसेवेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जनसेवेच्या माध्यमातून प्रतापगडाची वेगळी ओळख निर्माण केलेली होती. स्वर्गीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी प्रतापगडाला घालून दिलेला आदर्श याच आदर्शावर पद्मजादेवी मोहिते पाटील, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे मोहिते पाटील यांची वाटचाल सुरू आहे. राज्यात, जिल्ह्यात प्रतापगडाच्या विचारांचे अनेक नेते व कार्यकर्ते आहेत. याहीपेक्षा अकलूजमध्ये होम पिचवर असंख्य कार्यकर्ते आहेत. त्याची झलक अकलूज ग्रामपंचायतीच्या शेवटच्या निवडणुकीत उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांना बिनविरोध करून व फत्तेसिंह माने पाटील यांचे पुतणे गिरीराज माने पाटील व जनसेवेच्या ज्योतीताई कुंभार यांना निवडून आणण्यामध्ये डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता.
लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री पदावर असताना पद्मजादेवी मोहिते पाटील सोलापूर जिल्हा परिषदेवर विरोधी पक्ष नेते पदावर असताना डॉ. धवलसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषद सदस्य पदावर असताना अनेक सर्वसामान्य व गोरगरीब पीडित जनतेसाठी कार्य केलेले आहे. प्रतापगडावरील कार्यकर्ता निष्ठावान व कडवट आहे.

जनसेवा संघटनेच्या माध्यमातून अकलूज पंचक्रोशीत अनेक सामाजिक उपक्रमांमधून जनतेशी नाळ प्रतापगडाने कायम जपलेली आहे. शेतकरी मेळावा, रावण दहन, रक्षाबंधन, नागपंचमी, असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेमध्ये जनसेवेचा वेगळा ठसा उमटवला आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना त्यांच्या जनसेवा संघटनेचा पाठिंबा होता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मतदानाची वाढलेली टक्केवारी त्यामध्ये सुद्धा डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही. भाजप व महायुती डॉ. धवलसिंह मोहिते पाटील नसल्याने त्यांचा स्वतंत्र गट उभा असल्याने याचाही फटका महायुतीला बसणार आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील अकलूज नगर परिषद निवडणुकीत भाजप किंवा शिवरत्न यापैकी कोणत्या गटासमवेत निवडणुकीत उतरतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना स्वतंत्र निवडणूक लढत आहेत, याचा फटका भाजपला ? का शिवरत्नला बसणार ?. का मतदार तिसरा पर्याय म्हणून स्वीकारणार, अशीही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि भाजप व महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या प्रचाराचा नारळ अकलाई देवीला अर्पण करून प्रचाराची रणधुमाळी सुरू केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा व भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. मात्र दोन्हीही गटांनी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गटावर आरोप प्रत्यारोप केलेले नाहीत. अधिकृत चिन्हांचे वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचार शिगेला पोहोचणार आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या सभा होतील. त्यावेळेला कोणत्या गटाकडून कोणत्या मुद्द्यावर भर दिला जाईल, कोणते मुद्दे कळीचे ठरणार आहेत, हा येणारा काळच ठरवेल. मात्र, महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत न घेतल्याने अकलूज नगर परिषद निवडणूकीत किंमत मोजावी लागणार का ?, अशी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom