भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षातील गट तट बाजूला ठेवून काम करावे – मकरंद देशपांडे

सांगोल्यात १४ मंडल अध्यक्षांच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या
सांगोला (बारामती झटका)
सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील १४ मंडल अध्यक्षांच्या इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी सांगोल्यात पार पडल्या. प्रत्येकाला संघटनेत पद देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंडल अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पक्षातील गट तट बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्ष वाढीसाठी काम करावे, अशा सूचना पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी दिल्या.
सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या विधानसभा मतदारसंघातील मंडल अध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवार १७ एप्रिल सांगोल्यात पार पडल्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडल अध्यक्ष पदासाठी आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी निरीक्षक म्हणून पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र निवडणूक प्रमुख विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी घेतल्या.
यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, बार्शी विधानसभा निवडणूक प्रमुख रणवीर राऊत, राजकुमार पाटील, केशव पाटील, जिल्हा महामंत्री सचिन शिंदे, गणेश चिवटे, सुजित थिटे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.