नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी…

धारदार शस्त्र बाळगुण गावामध्ये दहशत माजवणारे आरोपी घेतले ताब्यात
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये दि. ०८/०८/२०२५ रोजी पेट्रॉलीग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे फोंडशिरस, ता. माळशिरस गावातील उमाजी नाईक चौकात इसम हे धारदार शस्त्रे हातात घेवून दहशत माजवत असलेबाबत गोपनीय बातमी मिळाल्याने लागलीच प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे यांच्या आदेशान्वये पोना/५६२ राकेश लोहार, पोकों/२०५८ असलम शेख, पोकॉ/५३२ रणजीत मदने, पोकॉ/७६४ अमोल बंदूके, पो कॉन्स्टेबल /1346, नवनाथ चव्हाण असे सरकारी वाहनाने सदर ठिकाणी जावून त्यांना गराडा घालुन पकडले. पकडलेल्या इसमांना त्यांचे पंचासमक्ष नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नाव १) ओंकार राजेंद्र गोरे वय – २० वर्षे, २) रोहित शंकर पारसे वय – २० वर्षे, दोघे रा. फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापुर असे असल्याचे सांगुन ओंकार राजेंद्र गोरे याचे हातात एक मोठी लोखंडी मुठ व पाते असलेली तलवार, तसेच एक लोखंडी मुठ असलेला वाकडा कोयता मिळुन आला व रोहित शंकर पारसे याचे हातात लाक मुठ असलेली लोखंडी कुकरी व लोखंडी मुठ असलेला रामपुरी चाकु असे धारधार शस्त्रे सदर इसमांचे हातात मिळुन आल्याने ते शस्त्रे पोना/५६२ राकेश लोहार यांनी जप्त केले आहे.
त्याबाबत फिर्यादी नामे पोकॉ/७६४ अमोल ज्ञानेश्वर बंदुके पोलीस अंमलदार नातेपुते पोलीस ठाणे यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं २८०/२०२५ शस्त्र अधिनयिम १९५९ चे कलम ४ व २५ प्रमा दि. ०८/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास पोना/५६२ राकेश लोहार करीत आहेत.
महारुद्र परजणे यांनी आवाहन केले आहे की, नातेपुते पोलीस ठाणे परिसरात आव्हान करण्यात येत आहे की, कोणी बेकायदेशीर अग्नी, शस्त्र किंवा धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत असल्यास त्याची माहिती नातेपुते पोलीस ठाणे येथे द्यावी. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सो. श्री अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रा. मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर, सोलापुर ग्रा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगावकर, अकलुज उपविभागीय अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. महारुद्र परजणे, पोहेकॉ/१७०० बाबर, पोना/५६२ राकेश लोहार, पोना /१६२० निलेश बल्लाळ, पोकॉ/७६४ अमोल बंदुके, पोकॉ/ २०५० अस्लम शेख, पोकॉ/५३२ रणजित मदने चापोकों / डी-२० राहुल वाघमोडे, नवनाथ चव्हाण यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



