ताज्या बातम्याराजकारण

भाजपा हा सर्व सामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष असून समाजाच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, सोलापूरचे माजी खासदार ॲड. शरद बनसोडे यांचे प्रतिपादन

मोहोळ विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये शरद बनसोडे यांचा झंजावाती दौरा

मोहोळ (बारामती झटका)

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर माजी खासदार शरद बनसोडे यांनी सक्रिय होत मोहोळ विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना आणि लोकोपयोगी निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही, याची माहिती घेतली. यावेळी त्यांचे समवेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, भाजपाचे मोहोळ तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, मोहोळ विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, विकास वाघमारे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष लिंगादेव निकम आदींनी अनेक ठिकाणी आपली मते व्यक्त केली.

लोकसभेला झालेला पराभव आणि त्याचे चिंतन करण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगण्यात आले. मोहोळ विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये शरद बनसोडे यांचा झंझावाती दौरा मोहोळ विधानसभा क्षेत्रातील कामती, कुरुल, शेजबाभुळगाव – अंकोली चौक, टाकळी सि. चौक, पाटकुल, पेनुर, टाकळी सिकंदर, फुलचिंचोली, तारापूर, खरसोळी, पुळुज, आंबेचींचोली आदी गावात शरद बनसोडे साहेब यांचे समवेत भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी प्रवास करून भाजपा कार्यकर्ते व सामान्य जनतेशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्या समवेत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष नामदे, कामतीचे संजय वाघमोडे, माजी उपसरपंच विठ्ठल माळी, कुरुलचे दिलीप कदम, नागेश भंडारे, तानाजी नवले, दिपक वसेकर, माऊली वसेकर, ब्रह्मदेव वसेकर, भाऊराव माळी, माजी पंचायत समिती सदस्य जगन्नाथ वसेकर, धर्मा माळी, भिमाचे माजी संचालक बापूसाहेब चव्हाण, तुकाराम भानवसे, गोरख भानवसे, अभिजीत लोखंडे, दिपक माने, तेजस भस्मे, विजय नामदे, प्रकाश गवळी, अण्णासाहेब सलगर, समाधान माने, प्रकाश भोसले, तानाजी पुजारी, बालाजी गवळी, अचीत चवरे, अर्जुन आढेगावकर, विठ्ठल गवळी, खरसोळीचे माजी सरपंच दिगंबर कांबळे, उपसरपंच अतुल पवार, छगन पवार, अमर पवार, हनुमंत काळे, दत्ता जाधव, निलेश मोहिते, सुनील गोवर्धनकर, अनिल बनसोडे, विठ्ठल गोरे, पुळुजचे सरपंच विश्वास महाडिक, माजी सरपंच भारत पाटील, दत्तात्रय पांढरे, मोहन गावडे, सदाशिव म्हम्हाणे, भगवान बाबर, माणिक शिंदे, अमर म्हमाणे, तारापूरचे माजी सरपंच वैभव डोळे, चेअरमन हनुमंत सपाटे, आबासाहेब देवकर, सौ. वंदना देवकर, काकासाहेब यादव, आंबेचींचोलीचे माजी सरपंच महादेव यादव, विजय वाघमारे, भारत आतकरे यांचे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या संपर्क दौऱ्यामुळे कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

4 Comments

  1. you are in reality a just right webmaster The site loading velocity is incredible It seems that you are doing any unique trick In addition The contents are masterwork you have performed a wonderful task on this topic

  2. Real Estate naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button