भाजपा किसान मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी डोंबाळवाडीचे माजी सरपंच महादेव केसकर यांची निवड.
नातेपुते (बारामती झटका)
डोंबाळवाडी (कु.) गावचे माजी सरपंच महादेवभाऊ केसकर यांची भाजपा किसान मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी निवड केली आहे. सदरच्या निवडीचे पत्र भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य सोलापूर जिल्हा सह प्रभारी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील व भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, अमोल माने, मिनीनाथ मगर, विजय घाडगे आदी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात महादेवभाऊ केसकर यांना मामा या नावाने ओळखतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पक्षाच्या वाढीसाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार आहे. ते गेली 25 ते 30 वर्ष पक्षाचे निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करीत आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी व खंदे समर्थक म्हणून परिचित आहेत. आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबाळवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आलेले होते. त्यांच्यावर पक्षाने व पदाधिकारी यांनी मोठी जबाबदारी दिलेली असून निश्चितपणे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून पक्षाचे कार्य जोमाने करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष महादेव भाऊ केसकर उर्फ मामा यांनी बोलताना सांगितले की, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते साहेब व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे काम अधिक जोमाने करून तळागाळापर्यंत व सर्व सामान्य माणसांपर्यंत भाजप पक्षाची विचारधारा पोचविण्याचे काम करून येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करून माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे फुललेले कमळ टवटवीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे यांनी आभार मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.