भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवराज पुकळे यांची निवड…
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा विभाग जिल्हाध्यक्षपदी शिवराज पुकळे यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर निवडीचे नियुक्तीपत्र भारतीय जनता पक्षाचे सोलापूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पिलीव गावचे भूमिपुत्र शिवराज सचिन पुकळे यांनी सामाजिक कार्यातून राजकारणाला सुरुवात केलेली होती. संघटन कौशल्याच्या जोरावर माळशिरस तालुक्यात तरुणवर्गाची फळी निर्माण केलेली आहे. कर्तुत्व, वक्तृत्व व दातृत्व हे तिन्हीही गुण शिवराज पुकळे यांच्यामध्ये आहेत. मोर्चे, आंदोलने यामध्ये सहभाग नोंदवून गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम असे विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी माळशिरस तालुक्यातील निरा देवधर प्रकल्पामध्ये उर्वरित गावांचा समावेश व्हावा, यासाठी माळशिरस तालुका निरा देवधर उर्वरित गावांची संघर्ष समिती निर्माण केलेली होती. अनेक गावांमधील शेतकरी, तरुण वर्ग यांच्याशी सुसंवाद साधून संघर्ष समिती बळकट केलेली होती. तत्कालीन माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या समवेत सततचा पाठपुरावा करून निरा देवधर प्रकल्पामध्ये उर्वरित गावांचा समावेश करण्यासाठी आंदोलने, उपोषणे, वाटेल ती तयारी करून उर्वरित गावांचा समावेश करण्यामध्ये शिवराज पुकळे यशस्वी झालेले होते.
कार्यकर्तुत्वाच्या जोरावर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी शिवराज भैय्या पुकळे यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली होती. लोकसभेच्या निवडणुकीत तरुणांच्या समवेत पायाला भिंगरी लावून माळशिरस तालुका पिंजून काढून भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे रुजवलेली होती. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याशी सुसंवाद व पक्ष वाढीविषयी नेहमी सकारात्मक भूमिका ठेवलेली असल्याने पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण-खटाव चे आमदार जयाभाऊ गोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे काम सुरू होते.
कार्याची पद्धत पाहून भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. पिलीव व पिलीव पंचक्रोशीत दिवाळी अगोदरच शिवराज पुकळे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीने फटाके फुटलेले आहेत. कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
jbbl0h
Tech Learner very informative articles or reviews at this time.
Dudaev s go or later at his appearance proved that true though could speak Bahel specially and