भाजपचा प्रोटोकॉल मोहिते पाटील यांना महागात पडला, जुन्या पक्षाची विचारधारा मनात रुजल्याने सहजवारी प्रसंग घेतला..
भाजपचे महाविजय संयोजक प्रमुख श्रीकांतजी भारतीय यांचे आगमन व स्नेहभजन प्रसंगी मोहिते पाटलांची भूमिका नडली.
माळशिरस (बारामती झटका)
मोहिते पाटील परिवार यांनी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास केल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे व विचारधारा वेगळी आहे. भाजपमध्ये कितीही मोठा वजनदार नेता अथवा राजकीय घराणे असो, पदावर असणाऱ्या व्यक्तीला मानाचे स्थान असते. भारतीय जनता पक्षाने महाविजय 2024 संयोजन प्रमुख विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांना भाजप पक्षाने प्रमुख पदावर नेमलेले होते. त्यावेळेस पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अखंड वैष्णवांचे दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आलेले होते. मोटारीने पुणे-इंदापूर-अकलूज-वेळापूर मार्गे पंढरपूरला गेलेले होते. ठिकठिकाणी संयोजन प्रमुख श्रीकांतजी भारतीय यांचा सन्मान केलेला होता. मात्र, मोहिते पाटील यांच्या अकलूज नगरीतून आलेले असताना मोहिते पाटील परिवारातील कोणत्याच पिढीने त्यांचा सन्मान केलेला नव्हता. वेळापूर येथे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी धर्मपुरीपासून तोंडले बोंडले येथील कार्यकर्ते जमा होऊन महाविजय संयोजक श्रीकांतजी भारतीय यांचा सन्मान केलेला होता. त्यावेळेस मोहिते पाटील यांनी श्रीकांतजी भारतीय यांचा सन्मान करण्याचे टाळले होते.
माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा दीपावली स्नेह मेळावा आमदार श्रीकांतजी भारतीय व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार होता. सदरचे सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नियोजित दौरा असल्याने बाहेरगावी जात आहे. सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही, असा एक प्रकारे सल्ला देऊन कार्यकर्त्यांना सुद्धा उपस्थित न राहण्याचे एक प्रकारे आवाहनच केलेले होते. तरीसुद्धा सदरचा कार्यक्रम यशस्वी होऊन श्रीकांतजी भारतीय यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संपर्क साधलेला होता. त्यामुळे भाजपचा प्रोटोकॉल मोहिते पाटील यांना माढा लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मागण्यासाठी महागात पडला आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी जुन्या पक्षाची विचारधारा मनात रुजल्याने भाजपला सहजवारी घेतलेले प्रसंग मोहिते पाटील यांना अडचणीचे ठरत आहेत, असे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. पक्षामध्ये राहून पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मोहिते पाटील यांना भविष्यामध्ये किंमत मोजावी लागणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.