भाजपचे कमळ माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांच्या राजकीय चिखलाच्या दलदलीतून बाहेर जोमाने व डौलाने बहरत आहे…

शिवरत्न वरील मोहिते पाटीलांचा भाजपच्या कमळाच्या पाकळ्या हातात धरून राजकारण टिकवण्याचा केविलवाणी प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू…
जली को आग कहते है, बुजीको राख कहते है, जिस राखसे बारुद निकलता है उसे रामभाऊ कहते है…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात प्रथमच भाजप सदस्यता अभियान राबवून भारतीय जनता पक्षाचे कमळ माळशिरस तालुक्यात गावागावात वाड्यावस्तावर व घराघरात पोहोचवलेले आहे, माळशिरस तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे कमळ माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांच्या राजकीय चिखलाच्या दलदलीतून बाहेर जोमाने व डौलाने बहरत आहे. माळशिरस तालुक्यात भाजपचे वातावरण झालेले असताना शिवरत्नवरील मोहिते पाटील भाजपच्या कमळाच्या पाकळ्या हातात धरून राजकारण टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची विधान परिषदेची आमदारकी रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे असताना दोन्ही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी गद्दारी करून विरोधी गटाला सहकार्य केले असल्याची राज्यातील व केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वांना चुकीची बाब लक्षात आलेली असल्याने भाजपमध्ये असूनसुद्धा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपच्या उद्घाटन कार्यक्रमातून व इतर वेळी हेतूपुरस्सर व जाणीवपूर्वक डावले जात आहे. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील बिन बुलाए मेहमान अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व इतर केंद्रीय व राज्यातील मंत्र्यांच्या व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या समवेत फोटो सेशन करून उत्साही कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. भारतीय जनता पक्षात मोहिते पाटील यांचा वावर कमी झालेला असल्याने तालुक्यातील अनेक नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये विकासाच्या व माजी आमदार राम सातपुते यांच्या अडचणीतील व गोरगरीब लोकांना सहकार्य करण्याच्या भावनेतून इतर पक्षातील नेते व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीमध्ये केंद्रातील व राज्यातील विकास कामांमुळे व माळशिरस तालुक्याच्या गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांचा प्रलंबित असणारा नीरा देवधर पाण्याचा प्रश्न, लोणंद फलटण पंढरपूर इंग्रज कालीन कागदावरील रेल्वे प्रत्यक्ष रेल्वे रुळावर आलेली आहे, माळशिरस तालुक्यातील एमआयडीसी चा प्रश्न, माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील माचनूर इरिगेशनला जोडलेली गावे पुन्हा निरा उजवा कालवा प्रकल्पाला जोडण्यात येणार आहे, असे अनेक महत्त्वकांक्षी निर्णय अंतिम टप्प्यात असल्याने माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या घटक पक्षांचा झेंडा माळशिरस तालुक्याच्या पंचायत समितीवर फडकणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेवर सुद्धा महायुतीचा झेंडा फडकण्याकरता अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. शिवरत्नवरील मोहिते पाटील यांचे जिकडे सत्ता तिकडे कल असतो, अशी आजपर्यंतच्या राजकीय इतिहासाची नोंद आहे. सध्या रणजीतसिंह मोहिते पाटील नावालाच भाजपमध्ये आहेत. इतर सर्व दोन-तीन पिढ्या इतर पक्षांमध्ये वावरत आहेत. अचानक तीन पिढ्या भाजपचे गुणगान गाताना पाहावयास मिळत आहेत. शिवरत्नवरील मोहिते पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये काडीमात्र संबंध नाही. मात्र भविष्यामध्ये माळशिरस तालुक्यात भाजपचे राजकारण आम्हीच करणार, अशा अफवा पसरवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र, केंद्रीय व राज्यातील नेतृत्वामध्ये मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय राजकारणात घेण्यामध्ये स्वारस्य नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये, असे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान नेते व कार्यकर्त्यांमधून भावना येत आहेत.

राजकारणामध्ये योद्धा राजनीतीत वरचढ होत असेल तर बदनाम केला जातो, तोच प्रकार संघर्षयोद्धा राम सातपुते यांच्या चढत्या राजकीय आलेखावरून अनुभूती येत आहे.
जली को आग कहते है, बुजीको राख कहते है, जिस राखसे बारुद निकलता है उसे रामभाऊ कहते है.
रामभाऊ:कर्तृत्वाचा सह्याद्री;
रामभाऊ :दातृत्वाचा हिमालय;
रामभाऊ:नेतृत्वाचा एव्हरेस्ट..!!
रामभाऊ:जनसामान्यांचा एक आधारवड…!!
रामभाऊ एक व्यक्ती नसून एक विचार आहात आपण. एक वैचारिक बैठक असलेलं असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे रामभाऊ, दूरदृष्टी आणि विकासाचे व्हिजन असलेलं उमदं नेतृत्व म्हणजे रामभाऊ..!! प्रतिकूल परिस्थितीत अचूक निर्णय घेऊन अनुकूल परिस्थिती निर्माण करणारा विलक्षण अवलिया म्हणजे रामभाऊ..; लाखोंचा पोशिंदा, जनसामान्यांचा त्राता, संकटमोचक, आणि हजारोंच्या प्राणाचा रक्षणकर्ता म्हणजे रामभाऊ. मायबाप जनतेसाठी अहोरात्र कष्ट करून, स्वतःचा जीव धोक्यात घालणारा कलियुगातील अर्जून म्हणजे रामभाऊ..!!


रामभाऊ आपल्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज फक्त माळशिरस तालुक्याला नसून अखंड जिल्ह्याला आहे. शेतकरी कष्टकरी जनता, सुखी झाली, आपल्या अचूक निर्णयक्षमता आणि दूरदृष्टीच्या जीवावर आपण पहिल्याच प्रयत्नात आमदार झालात. आजपर्यंत तालुक्यातील कोणालाच हे जमलं नाही, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराची ही मजल अलौकिक. रामभाऊ कर्तृत्व, त्याग, संयम आणि दूरदृष्टीचे प्रतीक ठरतो, टिम वर्क होते, सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद होता, आजही तो माणूस रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी काम करतोय. जनता रामभाऊ सोबत खंबीरपणे उभा आहे. माळशिरस तालुक्यातील आपला दांडगा जनसंपर्क जोपासतोय. यापुढेही आपल्या अशा अफलातून कर्तृत्वाची आशा सारा देश करतोय..!!
देश आपल्यासारख्या कर्तृत्ववान माणसांमुळेच घडतो, मातृभूमीचा नावलौकिक होतो, तो आपल्या सारख्या व्यक्तित्वामुळेच..!!

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



