भाजपची माळशिरस तालुक्यातील पॅरलल यंत्रणा कार्यान्वित, मोहिते पाटील समर्थक राजिनामा नाट्याचा फरक पडत नाही…

माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता पक्षामध्ये गाव व प्रभागांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष संघटनेत विशेष महत्त्व असते. बूथ प्रमुख शक्ती प्रमुख वाॅरिअर्स यांच्यावर प्रचाराची व मतदान प्रक्रियेची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. माढा लोकसभा मतदार संघात माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील परिवार यांच्याकडे बूथ प्रमुख व वॉरियर्स यांची यंत्रणा दिलेली होती. भारतीय जनता पक्षाचे मोहिते पाटील यांच्या चालीरीतीवरून विश्वास नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने पॅरलल यंत्रणा कार्यान्वित केलेली होती. मोहिते पाटील समर्थक राजीनामा नात्याचा फरक पडणार नाही, असे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांच्यामधून बोलले जात आहे.
माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रिय कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च संधी दिलेली असल्याने भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपने डावलले असल्याने मोहिते पाटील समर्थक भारतीय जनता पक्षामध्ये विविध पदावर काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांचे राजीनामा नाट्य सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात, अशा पद्धतीने भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.