भाजपच्या अनेक आमदारांचे मंत्रीपदासाठी फोन खणाणले, मात्र भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे नोटीसीच्या पत्राने धाबे दणाणले…
“जैसी करणी वैसी भरणी” या म्हणीचा प्रत्यय भारतीय जनता पार्टीने विधानसभेच्या निवडणुकीत गद्दारांना दाखवून दिला आहे…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने दैदीप्यमान यश संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्रिमंडळ स्थापन होऊन आठवड्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या आमदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान असणाऱ्या लोकप्रतिनिधींना पक्षश्रेष्ठींकडून फोन आलेले होते. भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदारांचे मंत्री पदासाठी फोन खणाणले मात्र, भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे कारणे दाखवा नोटीसीच्या पत्राने धाबे दणाणले, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. “जैसी करणी वैसी भरणी”, या म्हणीचा प्रत्यय भारतीय जनता पार्टीने विधानसभेच्या निवडणुकीत गद्दारांना दाखवून दिलेला आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस भारतीय जनता पार्टी कार्यालयातील सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी नोटीस जाहीर केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये खळबळ माजलेली आहे.
खऱ्या अर्थाने लोकसभेला व विधानसभेला रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रोटोकॉल पाळलेला नव्हता. समाज माध्यमांमध्ये राजीनामा द्यावा, अशी टीका टिपणी सुरू होती. तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी मागणी केलेली होती. त्याच मागणीचा धागा पकडत विधान परिषदेचे आमदार व भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांतजी भारतीय पंढरपूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर कारवाई होणार, असे संकेत दिलेले होते. आता प्रत्यक्ष नोटीस प्राप्त झालेली असल्याने रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन आमदारकीचा राजीनामा देऊन उच्चल बांगडी होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयातून आलेल्या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे,
विषय – पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्याने कारणे दाखवा नोटीस.
महोदय,
आपण भारतीय जनता पार्टीचे जबाबदार प्रतिनिधी असूनही पक्षशिस्त भंग करणारे कृत्य वारंवार केल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक विषयांत पुढीलप्रमाणे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
१) देशाचे पंतप्रधान सन्मा. नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस तथा केंद्रीय मंत्री सन्मा. नितीनजी गडकरी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास आपली अनुपस्थिती होती.
२) लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपाच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले.
३) पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपाच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले.
४) आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनास आले.
५) लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपा विरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आले.
६) विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपा विरोधी काम केल्याचे निदर्शनास आले.
७) महायुतीच्या सरकारने ज्या शंकर सहकारी कारखान्यास आर्थिक मदत केली, त्याच कारखान्यातील चिटबॉय कडून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार केला. तसेच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचे निदर्शनास आले.
८) पोलिंग एजंटला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
वरील सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपले काही स्पष्टीकरण असल्यास पुढील सात दिवसात लेखी स्वरुपात सादर करावे.
आपला,
(मुकुंद कुलकर्णी) कार्यालय सचिव
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
NY weekly I really like reading through a post that can make men and women think. Also, thank you for allowing me to comment!