भाजपच्या सोलापूर जिल्हा पश्चिम महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. सुरजाताई योगेश बोबडे यांची निवड..

टेंभुर्णी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सुरजाताई योगेश बोबडे यांना जिल्हाध्यक्ष पदाची वाढदिवसाला लॉटरी, जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू…
टेंभुर्णी (बारामती झटका)
टेंभुर्णी गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ. सुरजाताई योगेश बोबडे यांची भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. सौ. सुरजाताई बोबडे यांना जिल्हाध्यक्ष पदाची वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला लॉटरी लागलेली असल्याने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आ. आरोग्यदूत राम सातपुते यांच्यासह जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

माढा तालुक्याचे युवा नेते योगेश बोबडे माढा तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदावर काम करीत आहेत. पतीच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये खांद्याला खांदा लावून सुरजाताई राजकारण व समाजकारण करीत आहेत. टेंभुर्णी सारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. या मिळालेल्या संधीचे सोने करून टेंभुर्णी गावचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केलेले आहे. सरपंच पदाबरोबरच माऊली शिक्षण संस्था व स. मं. टेंभुर्णीच्या सचिव, जिजाऊ ब्रिगेड सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद सोलापूर जिल्हाध्यक्षपदी त्यांनी काम केले आहे.

राजकारणाबरोबर संघटन कौशल्य असल्याने सोलापूर जिल्ह्यात महिलांचे चांगले संघटन बांधून भविष्यात भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा ताकद वाढणार आहे. सुरजाताई बोबडे यांच्या निवडीने महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेली आहे….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



