भांब गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रफुल्ल पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड…

माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच उपसरपंच यांच्याकडे प्रभारी सरपंच पद व तंटामुक्ती अध्यक्ष बिनविरोध…
भांब (बारामती झटका)
भांब ता. माळशिरस, या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी श्री. प्रफुल्ल पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड ग्रामसभेमध्ये झालेली आहे. भांब गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती निवडीची ग्रामसभा दि. 15/10/2024 रोजी प्रभारी सरपंच व विद्यमान उपसरपंच श्री. प्रफुल्ल पांडुरंग काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी सुरेश पांढरे, दादा बापू काळे, नवनाथ मदने, संदीप रुपनवर, समाधान सरगर, बकुबाई राजेंद्र काळे सदस्य, बाळाबाई धुळा पांढरे सदस्य, संगीता बाळू काळे सदस्य, सुरेश कांबळे, नवनाथ कांबळे, मधुकर काळे, राजेंद्र काळे, बाळू काळे, महादेव सीद अध्यक्ष, राहुल जाधव, देवा काळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्राम विकास अधिकारी आर. बी. काळे, राहुल काळे, अभिजीत बाळू काळे, छबु काळे, आनंद जाधव, सदाशिव मदने, प्रल्हाद कांबळे, विजय मदने, महादेव काळे, तानाजी काळे, आशिष पांढरे, प्रमोद पांढरे, दादा सिद, सतीश पांढरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वानुमते श्री. प्रफुल्ल पांडुरंग काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. उपसरपंच यांच्याकडे प्रभारी सरपंच पदाचा पदभार आणि महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदाचा बहुमान तोही बिनविरोध असं माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.