भांब गावातील भाजप प्रेमी व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते समर्थक यांचा श्रीराम बंगला निवासस्थानी जल्लोष..
भांब गावची भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना लीड देण्याची परंपरा कायम ठेवणार..
भांब (बारामती झटका)
शिंगणापूरच्या पायथ्याला डोंगर कपारीमध्ये वसलेल्या संभाजीबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भांब गावची भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत लीड देण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे सांगत भांब गावातील भाजपप्रेमी व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते समर्थक यांनी मांडवे येथील श्रीराम बंगला जल्लोष करण्यात आला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते 2019 साली माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते. त्यावेळेस भांब गावातून लीड मिळालेले होते. त्यानंतर माढा लोकसभेच्या निवडणुकीत पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनासुद्धा भांब गावातून लीड मिळालेले होते.
यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदललेली आहे. मोहिते पाटील व उत्तमराव जानकर गट एकत्र आलेले आहेत तरीसुद्धा, भांब गावामधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना लीड देण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी मतदानानंतर आमदार राम सातपुते यांच्या भेटीस आल्यानंतर ठासून सांगितले. भांब गाव स्वाभिमानी आहे, कोणाच्याही भूलथापाला, दबावाला व लुडबुडीला बळी पडत नाही, असे सांगून सर्वांनी हात उंचावून माळशिरस तालुक्यात किती व कसे लीड मिळणार याचे आम्ही सांगू शकत नाही मात्र, भांब गावची परंपरा कायम ठेवणार असल्याचे भाजप प्रेमी व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते समर्थक यांनी श्रीराम बंगला या ठिकाणी आमदार राम सातपुते यांची भेट घेतल्यानंतर सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.