भांब, पाटीलवस्ती येथे गणेशोत्सवानिमित्त भव्य राज्यस्तरीय एक दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन

भांब (बारामती झटका)
भांब, ता. माळशिरस, येथे गणेशोत्सवानिमित्त भव्य राज्यस्तरीय एक दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन जय भवानी गणेश तरुण मंडळ भांब (पाटीलवस्ती), नवरात्र उत्सव तरुण मंडळ, पाटीलवस्ती यांच्या वतीने बुधवार दि. ११/९/२०२४ रोजी सायंकाळी ५ वा., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटीलवस्ती, (भांब) करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेमध्ये ६० किलो वजनी गटामध्ये श्री. गौतम आबा माने पाटील पंचायत समिती सदस्य, माळशिरस यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस ११ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. श्री. गणेश बापू पांढरे व श्री. हरी किसन खरात यांचे कडून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ७ हजार रु. व चषक देण्यात येणार आहे. श्री. पोपट दगडू सरगर सरपंच, ग्रामपंचायत भांब यांच्याकडून तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५ हजार रु. व चषक देण्यात येणार आहे. श्री. रणजीत शिवाजी पाटील युवा नेते यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस ३ हजार रु. व चषक देण्यात येणार आहे.

तसेच या भव्य स्पर्धेमध्ये श्री. पै. धनाजी ज्ञानदेव काळे यांच्याकडून मंडळास कबड्डी टी-शर्ट व श्री. पै. नारायण (आबा) माने पाटील यांच्याकडून ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९७६४६१३३२७, ८५९१०९८७२७, ९९२२०४५०६३, ९३२५७५५५७२, ९८९०३८८५६१ या नंबर वर संपर्क साधावा. तरी सर्व खेळाडू व कबड्डी प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.