भांब येथील गोपाळशेठ अण्णा शेंडगे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन….

भांब गावातील पेंटिंग व्यवसायिकांचे जनक व उद्योजक धुळा शेठ शेंडगे यांचे चुलते होते…
भांब (बारामती झटका)
भांब, ता. माळशिरस गावचे गोपाळ अण्णा शेंडगे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 22/08/ 2025 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक धुळाशेठ शेंडगे यांचे चुलते होते.
त्यांच्यावर भांब येथील राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम रविवार दि. 24/08/2025 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.

भांब गावातील पेंटिंग व्यावसायिकांचे जनक
50 ते 60 वर्षांपूर्वीचा भांब गावातील 1972 चा दुष्काळ, या दुष्काळामध्ये शेळ्यांच्या मागे फिरणारे गोपाळ शेंडगे (आप्पा). त्याकाळचे काही त्यांचे माण तालुक्यातील मित्रमंडळी यांच्या सहकार्याने जगण्यासाठी, रोजीरोटी साठी मुंबईची वाट धरली. आणि पेंटिंग व्यवसायाकडे वळले. आणि मुंबईत आल्यानंतर आपण पेंटिंग व्यवसाय करत आहोत, याची जाणीव ठेवून गावातील गोरगरीब शेळ्या मेंढ्यांच्या मागे बार्शी पर्यंत (काळ्यारणी) फिरणाऱ्या अर्धशिक्षित मुलांना पेंटिंग (रंगकाम) धंद्याकडे वळवले. भांब गावातील पेंटिंग व्यवसायाचे थोडक्यात प्रेरक होते. आणि आज एक प्रतिष्ठित व्यवसायिक झाले होते. या छोट्याशा गावाला व्यवसाय काय असतो, हे शिकवणारे पहिले सही न करणारे व्यावसायिक. शेतीपासून काहीशा प्रमाणात दूर पण ज्यांचा जन्म भांब गावच्या संभाजी बाबाच्या दऱ्यात झाला, ज्यांच्या लहानपणाची सुरुवात मेंढपाळ म्हणून झाली, मेंढपाळ ते मुंबई आणि मुंबई ते बेंगलोर व्यवसायानिमित्त बेंगलोरला स्थायिक झाले आणि स्वकर्तुत्वाने एक सही न करता येणारे अडाणी व्यक्तिमत्व ते आदानी बरोबर चहा पिण्याची संधी निर्माण करणारे गोपाळशेठ शेंडगे यांचा जीवन प्रवास.
अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंड, लेक जावई. त्यांच्या परिवारास ह्या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. शहरांमध्ये व्यवसाय कसा करावा आणि त्यातून अर्थाजन कसे करावे. खूप मोठे व्यक्तिमत्व, मनाने मनमिळावू, सर्वांना सांभाळून घेणारे, शांत, संयमी, सर्व गावाचे भाऊजी, असे आपल्या सर्वांचे आप्पा. त्यांना आपणा सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. शेंडगे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व आप्पांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



