भांबुर्डी गावातील दैदीप्यमान व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान संपन्न झाला…

सामाजिक कार्यकर्ते विष्णू आण्णा वाघमोडे मित्र परिवाराच्यावतीने सन्मान सोहळा संपन्न
भांबुर्डी (बारामती झटका)
भांबुर्डी गावची कन्या कुमारी सारिका भारत ढेंबरे हिची नंदुरबार जिल्हा पोलीस पदी निवड, पृथ्वीराज दादासाहेब वाघमोडे यांनी ४१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक व राजवर्धन दादासाहेब वाघमोडे याने ३८ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल दैदीप्यमान कामगिरी केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान भांबुर्डी गावचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विष्णू आण्णा वाघमोडे मित्रपरिवार यांच्यावतीने संपन्न करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विष्णू आण्णा वाघमोडे, सोमा सुतार, गेनबा वाघमोडे पाटील, महेश खंडागळे, अविनाश वाघमोडे, दादासाहेब वाघमोडे, सुखदेव नरळे, बापू ढेंबरे, वसंत सूर्यवंशी, आनंद देवकाते, विष्णुपंत सुतार व गावातील भजनी मंडळ व गावातील मंडळी उपस्थित होते.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.