भांबुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरे वस्ती येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

माळशिरस (बारामती झटका)
शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरे वस्ती, भांबुर्डी, ता. माळशिरस या ठिकाणी चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमांमध्ये बालचमूंनी आपल्या अंगी असणाऱ्या गुणांचे अतिशय उत्कृष्टपणे व उत्साहात प्रदर्शन केले. गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दादही दिली. सर्व ग्रामस्थांनी शाळा व शिक्षक तसेच विद्यार्थी या सर्वांचे कौतुक करून शिक्षकांना त्यांच्या कार्याची पोचपावतीच दिली. सर्व पालकांनी पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगला कार्यक्रम करण्यासाठी मदत देऊ, असे आश्वासन दिले व शिक्षकांनी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीताई प्रशाला मोटेवस्तीचे अध्यक्ष श्री. अजितकुमार उर्फ काकासाहेब मोटे व भांबुर्डी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य रवितात्या मोटे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक शेंडगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरे वस्तीचे मुख्याध्यापक शामराव काळे, 2001 च्या बॅचचे माजी विद्यार्थी सचिन वाघमोडे व सर्व पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री. माणिक करडे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. माधव वाघमोडे यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.