श्रीपूर पंचक्रोशीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व श्रीपाद उर्फ भाऊसाहेब कुलकर्णी

श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर पंचक्रोशीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वमान्य असलेले श्रीपाद उर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांचा तेरा एप्रिल हा जन्मदिन… अत्यंत साधेपणाने व सर्वांशी मिळून मिसळून वागणारे तितकेच या पंचक्रोशीत राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वांबरोबर तेवढेच ऋणानुबंध जपलेले एक सदाबहार व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत पण, ते तेवढ्याच उमेदीने जनमानसात वावरत असतात. ते धार्मिक श्रद्धाळू आहेत तेवढेच पुरोगामी व बदलत्या काळानुसार जुळवून घेतात. या भागातील अनेक समाजातील गरजू व होतकरू तरुणांना त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. शासकीय नोकर भरती असो, खाजगी कंपनी असो, त्यात आपल्या माहितीप्रमाणे, अनुभवाने, ओळखीने, ज्याच्या त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. ते बीएससी ॲग्री असल्याने शेतीतील त्यांना चांगला अनुभव पाठीशी आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी त्यांच्या शेतात अनेक शेतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. सुधारीत शेती करुन वेगवेगळे वाण विकसित केले आहेत. या भागातील धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे.
महाराष्ट्रात अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत, मैत्री आहे. अनेक आमदार, खासदार, मंत्री त्यांना वैयक्तिक नावाने ओळखतात. मंत्रालयात अनेक सनदी अधिकारी, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक त्यांचे मित्र आहेत. त्यांनी सोलापूर जिल्हा कृषी सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन पद भुषविले आहे. श्रीपूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे म्हणून तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भेटून खास बाब म्हणून लेखी आर्डर घेतली आहे. तत्कालीन सोलापूर जिल्हा अधिकारी गोकुळ मवारे यांनी महाळुंग ग्रामपंचायतला लेखी आदेश पत्र देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभी राहिली आहे. इमारत पुर्ण झाली आणि दुर्दैवाने कोरोना साथ आली आणि ही इमारत कोवीड सेंटर म्हणून शासनाने इमारत ताब्यात घेतली. हा असा एकंदरीत या आरोग्य केंद्राच्या पाठीमागील पुर्व इतिहास आहे. भाऊसाहेब कुलकर्णी हे त्यावेळी शासकीय सेवेत असल्याने या विषयापासून ते अलिप्त राहिले होते. पण असे अनेक सामाजिक व विकासासाठी सचिवालयात त्यांनी पत्र व्यवहार, निवेदन देण्यात पुढाकार घेतला आहे. अनेकदा ते स्वतःचे नाव पुढे येऊ नये म्हणून प्रसिद्धीपासून लांब राहणे पसंत केले आहे.
त्यांचा बोलका स्वभाव आहे. तसेच मित्र परिवार यांच्या संपर्कात ते कायम राहतात. त्यामुळे त्यांचे वेळच्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे गेट टुगेदर नेहमी घेण्याबाबत आग्रही व कार्यरत असतात. त्यांनी त्यांच्या दोन मुली उच्च शिक्षीत केल्या आहेत. थोरली मुलगी नाशिक येथे डॉक्टर आहे, जावई डॉक्टर आहेत तर धाकटी मुलगी आयटी इंजिनियर आहे नामवंत कंपनीत ती मोठ्या पदावर कार्यरत आहे. मुलगा इंजिनिअर आहे. भाऊसाहेब कुलकर्णी यांचे संपूर्ण कुटुंब सधन, शिक्षीत व सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम आहे. बहिणी, मेहुणे, भाचे आपापल्या ठिकाणी भक्कम स्थितीत आहेत. त्यांचा एक भाचा मधुकर जोशी पुणे विद्यापिठात इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. भाऊसाहेब यांचे दिवंगत मेहुणे बापूसाहेब जोशी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे अहमदनगर जिल्ह्यातील एका ऊस फार्महाऊसवर स्थावर व्यवस्थापक म्हणून सेवेत होते. मेहुणे जिल्हा सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय पदावर होते. एकुणच कुलकर्णी परिवार सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व मित्रपरिवार यांच्यातील सामाजिक मैत्रीचा सेतू बांधणारा परिवार आहे.
महाळुंग श्रीपूर मायनर येथे त्यांचे आजोबा सेक्शन आफिसर होते. त्यांनी मायनर येथे दत्त मंदिर बांधले. त्याचे स्वरूप आता व्यापक झाले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. दरवर्षी दत्त जयंतीला मोठा सोहळा साजरा होतो, महाप्रसाद दिला जातो. यात दत्त मंदिर भाविक मंडळ यांचे बरोबर भाऊसाहेब कुलकर्णी यांचाही सहभाग मोठा असतो. असे हे लोकप्रिय व सर्वांना आपले वाटणारे मनमिळाऊ व्यक्तीमत्व असणारे श्रीपाद उर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरण पुर्वक शुभेच्छा देत असताना त्यांना दिर्घायुष्य लाभो या सदिच्छा…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.