भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी चा ग्रामपंचायत सदाशिवनगर ला दुसऱ्यांदा व पुरंदावडे गावाला प्रथमच विमा ग्राम पुरस्कार जाहीर.

सदाशिवनगर (बारामती झटका)
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांचेतर्फे दिला जाणारा बिमा ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत सदाशिवनगरला सलग दुसऱ्यांदा तर ग्रामपंचायत पुरंदावडेला प्रथमच मिळाला आहे.
या पुरस्काराचे वितरण विधानपरिषद आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच केले जाणार असल्याची माहिती एलआयसी प्रतिनिधी श्री. सागर उरवणे यांनी दिली.
या पुरस्काराचे स्वरूप बिमा ग्राम पुरस्कार व गावाच्या विकासासाठी १ लाख रुपये निधी असा असणार आहे. यामुळे गावाच्या विकासामध्ये भर पडणार असून आपल्या जीवनशैलीमध्ये एलआयसी विमा असणे किती महत्वाचे आहे, हे देखील समजणे गरजेचे आहे. धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या, कुटुंबाच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) अगदी किफायशीर ठरु शकते.
आज या उपक्रमामुळे समाजामध्ये याची जनजागृती तर हाईलच परंतु, एक आदर्श देखील निर्माण होईल. या पुरस्कारामध्ये एलआयसी प्रतिनिधी सागर उरवणे यांची मोलाची कामगिरी आहे. त्यांच्यामुळे या दोन्ही गावांच्या विकासामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे त्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.