ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी संजय देशमुख यांची वर्णी लागण्याची शक्यता ?

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी तरंगफळ गावचे थोर सुपुत्र संजयजी देशमुख यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून हालचालीला वेग आलेला आहे.

संजय देशमुख यांचे मूळ गाव भांबुर्डी ता. माळशिरस आहे. ते सध्या तरंगफळ येथे वास्तव्यास आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये २०११ सालापासून सक्रिय आहेत. सुरुवातीस कार्यकर्ता पदावर काम करून सध्या भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. पूर्वी भाजपमध्ये संघटन सरचिटणीस पदी असताना दोन वेळेस संघटन सरचिटणीस पदावर काम केलेले आहे. माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विधानसभेला लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व लोकसभेला पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने तालुक्यात कमळ फुलत असताना कर्तव्यदक्ष तालुका अध्यक्ष सोपानकाका नारनवर व संघटन सरचिटणीस संजय देशमुख कार्यरत होते.

भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्य कर्तृत्वातून संधी मिळत असते. संजय देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्याचे निष्ठेने काम केलेले आहे. माढा लोकसभेचे परमनंट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार व सोलापूर लोकसभेचे भावी खासदार आमदार राम सातपुते यांचे खंदे समर्थक आहेत. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काम करीत असताना सोपानकाका नारनवर, के. के. पाटील, बाळासाहेब सरगर, हनुमंत सुळ पाटील, बाळासाहेब वावरे, मुक्तार कोरबू, बाजीराव काटकर, दत्तात्रय शेळके, दादासाहेब खरात, लक्ष्मण उर्फ पिनू माने, युवराज वाघमोडे, यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून माळशिरस तालुका अध्यक्षपदी संजय देशमुख यांची तालुका अध्यक्षपदी वर्णी लागण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. माळशिरस तालुक्यात धनगर समाजास तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button