ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रितमसिंह देवकाते पाटील यांची वर्णी लागावी, माळशिरसकरांची इच्छा….

स्वर्गीय शिवाजीराव पाटील ॲड. सुभाष अण्णा पाटील यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे नेहण्याकरता प्रितमसिंह देवकाते पाटील यांना संधी द्यावी..

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री. चेतनसिंह केदार सावंत सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदाची धुरा सांभाळत असल्याने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. रिक्त झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी मल्हार साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह संचालक प्रितमसिंह काशिनाथ देवकाते पाटील यांची वर्णी लागावी, अशी माळशिरसकरांची इच्छा आहे. माळशिरस तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधामध्ये स्वर्गीय शिवाजीराव भाऊ पाटील, ॲड. सुभाष अण्णा पाटील यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे नेण्याकरिता प्रितमसिंह देवकाते पाटील यांना संधी द्यावी अशी मागणी होत आहे…

सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुका कायम राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेला तालुका आहे. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये स्वर्गीय शिवाजीराव पाटील भाऊंनी जनता दलाच्या जिल्हाध्यक्ष पदावर काम केलेले आहे. ॲड. सुभाष अण्णा पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर काम केलेले आहे. माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये पाटील परिवारांचे मोठे योगदान आहे. सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी या तालुक्यांमध्ये धनगर समाजाचे जास्त मतदार आहेत, याचाही फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे.

प्रितमसिंह देवकाते पाटील परिवार यांच्या विचाराचा वसा व वारसा पुढे चालवत आहेत. चांदापुरीच्या माळरानावर मल्हार साखर कारखान्याची निर्मिती अंतिम टप्प्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. याचाही फायदा राजकारणात होऊ शकतो. जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी पदाची जबाबदारी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या रिक्त झालेल्या सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा अध्यक्षपदी युवा नेतृत्व प्रितमसिंह काशिनाथ देवकाते पाटील यांना संधी द्यावी, अशी माळशिरसकरांची इच्छा आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button