ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पार्टीच्या नातेपुते मंडल उपाध्यक्षपदी हरिभाऊ विठ्ठल पालवे यांची निवड…

भाजपच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन नातेपुते मंडल कार्यकारणी सदस्यावरून उपाध्यक्ष पदावर पदोन्नती…

सदाशिवनगर (बारामती झटका)

भारतीय जनता पक्षाची निष्ठावान कार्यकर्त्याच्या जोरावर भक्कमपणे देशात व राज्यात वाटचाल सुरू आहे. भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याच्या कार्याला महत्व दिले जाते, याचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे सदाशिवनगर गावचे रहिवासी व भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते हरिभाऊ विठ्ठल पालवे यांना भारतीय जनता पार्टीच्या नातेपुते मंडल उपाध्यक्षपदी निवड करून भाजपच्या संघटनात्मक कार्याची दखल घेतलेली आहे. नातेपुते मंडल कार्यकारणी सदस्यावरून उपाध्यक्ष पदावर पदोन्नती झालेली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्या रूपाने माळशिरस तालुक्यात पहिल्यांदा कमळ फुलून भाजपचे आमदार होण्याचा बहुमान आरोग्यदूत राम सातपुते यांना मिळालेला आहे. भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे व पाळेमुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याकरता आरोग्यदूत राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच भाजप सदस्यता अभियान राबवलेले आहे. माळशिरस तालुक्यातील गावागावात, वाड्यावास्त्यावर भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता तयार झालेला आहे. 70 हजार लोकांनी भारतीय जनता शपार्टीचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे.

भाजपमध्ये वशिला किंवा शिडीचा उपयोग होत नाही. कार्यकर्ता आपल्या कर्तुत्वाने वाटचाल करीत असतात. माळशिरस तालुका अध्यक्षांबरोबर माळशिरस, अकलूज, नातेपुते अशी तीन वेगवेगळी मंडल केलेली असून प्रत्येक मंडलची कार्यकारणी जाहीर केलेली आहे. नातेपुते मंडल चे अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी नातेपुते मंडल कार्यकारणी जाहीर केलेली होती. सदरच्या कार्यकारणी मध्ये हरिभाऊ विठ्ठल पालवे यांना कार्यकारणी सदस्य केलेले होते. कार्यकारणी सदस्य कालामध्ये हरिभाऊ पालवे यांनी मंडल मध्ये पक्ष वाढीचे काम जोमाने केलेले आहे. असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यात हरिभाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे.

भाजपने कार्याची दखल घेऊन हरिभाऊ पालवे यांची नातेपुते मंडलच्या उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे. आरोग्यदूत राम सातपुते यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाची जबाबदारी घेऊन पक्ष वाढीचे काम जोमाने सुरू आहे. त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या कारकीर्दीसाठी पुरंदावडे सदाशिवनगर येथून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom