ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची दहिगाव येथे तोफ धडाडणार…

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील दहिगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न होणार…

दहिगाव (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वात महत्त्वाची व राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची असणारी दहिगाव ग्रामपंचायत आहे. अशा दहिगाव गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन सोमवार दि. ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. भारतीय जनता पार्टी दहिगाव शाखेचे अध्यक्ष अमर किर्दक, कार्याध्यक्ष किरण गोडसे, खजिनदार मारुती बापू गटकुळ, उपाध्यक्ष धनंजय फुले, उपकार्याध्यक्ष हर्षवर्धन खंडागळे, उपमार्गदर्शक विशाल फुले, संघटक महादेव नाकुरे, सहसंघटक रोहित जाधव, सहखजिनदार अनिल गुळीक, मार्गदर्शक सचिन काटकर, सचिव राजेंद्र पाटील, संस्थापक सागर पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते शाखा उद्घाटनाच्या तयारीला लागलेले आहे.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा आणलेली होती. गेल्या ७० वर्षांमध्ये अनेक प्रलंबित असणारी विकासाची कामे केलेली होती. विशेष करून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम गेल्या पाच वर्षांमध्ये तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी केलेले होते. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील व जानकर गट एकत्र येऊन सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर अनेक गावांमधून राम सातपुते यांना जास्त मताधिक्य मिळालेले होते. विधानसभेच्या निवडणुकीत निसटता पराभव जरी झाला असला तरी केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राम सातपुते यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना रामभाऊ तुम्ही संघर्ष करा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. माळशिरस तालुक्यात रयतेचे राज्य येईपर्यंत तुमचा संघर्ष असाच चालू ठेवा, असा वाढदिवसाला संदेश दिलेला होता. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखडा बैठकीसाठी आलेले होते, त्यावेळेस श्री पांडुरंगाचे दर्शन घेत असताना आरोग्यदूत राम सातपुते उपस्थित होते.

कालच गुढीपाडवा सणाने नवीन हिंदू वर्षाला सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षात पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच दहिगाव येथे शाखा ओपनिंग होत असल्याने आमदार राम सातपुते यांची तोफ शाखा उद्घाटन प्रसंगी धडाडणार असल्याने अनेक राजकारणी व राजकीय विश्लेषक यांचे लक्ष लागून राहिलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button