ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले, विरोधी गटात चर्चेला उधाण…

शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेले होते..

माळशिरस (बारामती झटका)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभ निमंत्रण नसल्याचे कारण करून समाज माध्यमांसमोर भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबू, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका माजी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले असल्याची चर्चा विरोधी गटात सुरू असून चर्चेला उधाण आलेली आहे.

घडलेली हकीकत अशी की, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते माळशिरस येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे भूमिपूजन शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी हायब्रीड एनडीटी मॉडेल योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कळंबोली-नातेपुते-शिंगणापूर रस्ता रा. मा. 124 किलोमीटर २४/५०० ते ४९/६०० मध्ये रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा व माळशिरस येथील नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचे बांधकाम कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. विशेष उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे सदस्य रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा सदस्य आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला‌.

सदरच्या कार्यक्रमाचे सार्वजनिक बांधकामांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम होणार आहे, अशी बारामती झटका वेब पोर्टल यांनी बातमी प्रसारित केलेली होती.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांसमोर सदरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याचे सांगितलेले होते. परंतु, शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित लोकप्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांना निमंत्रण पत्रिका देऊन पत्रिकेमध्ये नामोल्लेख केलेला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय प्रोटोकॉल पाळलेला आहे. कोणत्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना शासकीय लोकार्पण सोहळा भूमिपूजन किंवा उद्घाटन यांचे निमंत्रण देण्याचा प्रश्नच येत नाही‌. लोकप्रतिनिधी खासदार व दोन आमदार उपस्थित होते. यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निरोप देणे गरजेचे होते, असाही प्रश्न उपस्थित केला‌ मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री पक्षाचे लोकप्रतिनिधी खासदार, आमदार उपस्थित राहत आहेत म्हटल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रणाची वाट सुद्धा पहावयास नको, असा विरोधी गटातून सूर निघत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कार्यक्रमानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतलेले आहे विरोधी गटात चर्चेला उधाण आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button