उपद्रव मूल्य लोकांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडते, यामुळे अशी कारवाई होणे गरजेचे आहे – पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी…

वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील २८ अवैध दारू विक्रेत्यांना माळशिरस तालुक्यामध्ये बंदी करण्याचा आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला योग्य कारवाई…
वेळापूर (बारामती झटका)
समाजामध्ये व्यवसाय करणारे उपद्रव्य मूल्य लोकांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडते यामुळे अशी कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना आळा बसून दारू विकणारे व पिणारे यांचा जनतेला त्रास होणार नाही व त्यांच्यावर अंकुश बसेल. कारवाईबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले..

वेळापूर पोलीस ठाणे हद्दीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दरम्यान पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी पायी चालत पंढरपूर येथे जात असतात. सदर कालावधीत उपद्रवी इसम चोरून दारू विक्री केल्यास गावातील लोक अगर उपद्रवी इसम दारू पिवून दारूच्या नशेत पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी यांचेसोबत किंवा गावातील लोकांसोबत भांडणतंटा होवू नये व पालखी सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी वेळापूर पोलीस ठाणे हददीत चोरून अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमांवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कायद्याप्रमाणे मा. उपविभागिय पोलीस अधिकारी अकलुज यांचे मार्फतीने मा. उपविभागिय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांचेकडे २८ इसमांविरुध्द प्रस्ताव पाठविले होते. मा. उपविभागिय दंडाधिकारी माळशिरस यांनी वेळापूर पोलीस हद्दीतील चोरून दारू विक्री करणाऱ्या २८ इसमांना पालखी सोहळा कालावधीत माळशिरस तालुक्याच्या हद्दीत राहण्यास व प्रवेश करण्यास मनाई आदेश काढले आहे. सदरचे आदेश संबंधित इसमांना मनाई आदेश बजावण्यात आले आहेत.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर, उपविभागिय पोलीस अधिकारी अकलुज श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाउसाहेब गोसावी तसेच वेळापूर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी सदरची कारवाई केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



