भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. सागरदादा वाघमारे यांची निवड…

मोहोळ (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. सागरदादा वाघमारे यांची निवड जाहीर झाली. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या यापुढील राजकीय वाटचालीस खुप खुप शुभेच्छा…
मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते सागरदादा वाघमारे यांची युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी निवड जाहिर केली आहे. सोलापूर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहुल भैय्या लोणीकर यांच्याशी चर्चा करून यादव यांनी जिल्हा पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.

यापूर्वी सागर वाघमारे यांनी युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष पदावर काम केले आहे. त्यांना पक्षाने वेळोवेळी दिलेल्या संघटनात्मक सर्व जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ते भाजपाचे काम करीत आहेत. लहानपणापासून त्यांना घरातूनच पक्षकार्याचा वसा मिळाला आहे. पदवीधर असलेले सागर वाघमारे यांना आता ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडी नंतर पक्षातील अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, फोन करून, मेसेज करून त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे मोहोळ तालुक्यातील अनेक गावात आनंदी व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.