ताज्या बातम्या

भारतीय वायू सेना दलातील सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर श्री. दत्तात्रय शिंदे यांचे दुःखद निधन

श्रीम. मनीषा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे सासरे

कोल्हापूर (बारामती झटका)

भारतीय वायू सेना दलातील सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर श्री. दत्तात्रय लक्ष्मण शिंदे (वय ८२) यांचे आज दुःखद निधन झाले. श्री. शिंदे हे श्रीम. मनीषा देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे सासरे होत.

त्यांनी भारतीय वायू दलात २६ वर्ष सेवा केली. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतातील विमान तळावर आपली सेवा बजावली. तसेच त्यांनी पंजाब, आसाम, गुजरात, कर्नाटकातील हवाई तळावर विशेष सेवा बजावली. वायू दलातुन सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये सेवा केली.

त्यांच्या पश्चात पत्नी श्रीम. सुशीला, मुलगा डॉ. वैभव, सून सौ. मनीषा देसाई-शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) जिल्हा परिषद कोल्हापूर व मुलगी डॉ. वैशाली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button