भातांगळीची शंभू महादेवाची काठी नातेपुते कॅनॉल ते चिंदादेवी रस्ता दुरुस्तीवरून लवकरच जाणार पालकमंत्री ना. जयकुमार गोरे..

हनुमंत जगताप व सहकारी यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत निवेदन दिले.
नातेपुते (बारामती झटका)
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांना हनुमंत काशिनाथ जगताप यांनी नातेपुते कॅनॉल ते चिंदादेवी रस्ता होण्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मौ. भातागळी, ता. लोहारा, जि. धाराशीव येथून शंभो महादेवाची मानाची काटी शिखर शिंगणापूर येथे जाते. सदरील काटी सोबत हजारो भावीक असतात. सदरील काटी ही नतिपुते येथे आल्यानंतर कॅनॉलहून चिंदादेवी येथे जाते व तिथून पुढे शिखर शिंगणापूरकडे जाते.
सध्या कॅनॉल ते चिंदादेवी पर्यंत कच्चा रस्ता आहे. फार पूर्वी जवळपास 1972 साली या रस्त्याचे काम झाले होते. त्यामुळे हा रस्ता आता अत्यंत खराव झाला आहे. काटी सोबत असणार्या भाविकांची रस्ता नसल्याने गैरसोय होत आहे.
त्यामुळे नातेपुते कॅनॉल ते चिंदादेवी रस्त्याचे काम करून घ्यावे व नागरीकांची तसेच भाविकाची गैरसोय दूर करावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. सदरच्या निवेदनाची दखल घेत लवकरच सदरचा रस्ता दुरुस्त करून शंभू महादेवाची मानाची काठी शिखर शिंगणापूर येथे पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रस्ता दुरुस्त करण्याचे संकेत उपस्थितांना दिले
सदर निवेदनावर उमाकांत कुलकर्णी, अण्णा जगताप, प्रभु साठे, शेबेराव जगताप, दाजी अनंदगावकर, दत्ता काकडे, महादेव साठे, पद्माकर जगताप, मारुती चव्हाण, रामा खंडाळे, भरत चव्हाण, ॲड. बि. वाय. राऊत, प्रशांत कुचेकर, दिग्विजय मोरे, हरिभाऊ कसपटे आदींच्या सह्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.