ब्रेकिंग न्यूज : युवक हृदयसम्राट डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे शिलेदार यांनी राजीनामा सुपूर्त केला…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष युवक हृदयसम्राट डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता युवकांचे आयडॉल डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासू खंदे समर्थक माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीशनाना पालकर, अकलूज शहराध्यक्ष नवनाथ भाऊ साठे, युवक उपाध्यक्ष मयूर माने, कैलास जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विचाराचा वारसा व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द सुरू आहे. सहकार महर्षी व स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी राजकारणामध्ये ताठ मानेने राजकारण केलेले महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेले आहे. तोच वसा आणि वारसा जपणाऱ्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धाडसी निर्णयाचे राजकीय वर्तुळामध्ये कौतुक केले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Suadiye su kaçak tespiti Su kaçağını tespit edip onarmaları gerçekten çok hızlı oldu. https://www.villas-deluxe.com/author/kacak/
qaig52
Rely on BWER Company for superior weighbridge solutions in Iraq, offering advanced designs, unmatched precision, and tailored services for diverse industrial applications.