बुलढाणा येथे भीमा तुझ्या मताचे.. चर्चासत्र संपन्न

महामानवांच्या विचारामुळेच लोकशाही जिवंत आहे : ॲड. सतीशचंद्र रोठे
बुलढाणा (बारामती झटका)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग आणि समर्पणातूनच देशांमध्ये संविधान आणि लोकशाहीची पाळीमुळे घट्ट झाली. महामानवांच्या विचारामुळेच आज देशात लोकशाही जिवंत आहे. तोच समतेचा, मानवतेचा विचार आज स्वयंकेंद्रित राज्यकर्त्यांनी गढूळ करण्याचा प्रयास चालविला आहे. राज्यकर्त्यांचे कलुषित मनसुबे उधळून लावण्यासाठी बहुजनांनी संघर्षासाठी तत्पर राहावे तेच बाबासाहेबांना अभिवादन राहील, असे मत ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केले.
स्थानिक बुलढाणामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबरला दुपारी आझाद हिंद च्या संपर्क कार्यालयात शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने “भीमा तुझ्या मताचे” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात अभिवादनपर मनोगत व्यक्त करताना रोठेंनी उपरोक्त मत व्यक्त केले.

यावेळी संत रोहिदास समता परिषदेचे इंजि. शिवाजी जोहरे, ज्येष्ठ समाजसेवी नारायणराव भाकडे, राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रांत उपाध्यक्ष भूपेश पाटील, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, राम व्यवहारे, आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे आदी प्रमुख मान्यवरांसह आझाद हिंदचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, तालुकाध्यक्ष रमा गोरे, सुशांत पाटील, विशाल राणे, नितेश डहाळे, रवींद्र जाधव, पांडुरंग मोरे, किशोर शेळके, सुभाष भागीले, निर्मला जाधव, मीरा भालेराव, कविता पाटील, संजू जाधव, आशाताई गायकवाड, अनुसयाताई पवार आदींनी चर्चासत्रात सहभाग घेत अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
चर्चासत्रात विविध सामाजिक चळवळींचा सहभाग होता, त्यामध्ये रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्राम स्वराज्य समिती, बुलढाणा शहर विकास आघाडी, महाराष्ट्र विकास आघाडी, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, राष्ट्रीय बजरंग दल, आझाद हिंद महिला संघटना, छत्रपती स्वराज्य संघटना यासह जिल्ह्यातील बहुजन चळवळीतील प्रमुख संघटना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चर्चा सत्राच्या यशस्वीतेसाठी सहभाग नोंदविला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



