बुल कॅपिटल शेअर मार्केटिंगच्या नावाने फसवणूक करणाऱ्या चौघांच्या विरोधात अकलूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल…

माळेवाडी अकलूज येथील महादेव उर्फ पिनू तोरसकर यांना 61 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करून गंडा घातला…
अकलूज (बारामती झटका)
श्री महादेव विश्वासराव तोरसकर उर्फ पिनू तोरसकर यांना 61 लाख 30 रुपयाची फसवणूक करून गंडा घालणाऱ्या बुल कॅपिटल शेअर मार्केटिंगच्या नावाने फसवणूक करणाऱ्या १) नसीर उर्फ सलमान नदीम चौधरी, २) इमरान नदीम चौधरी, ३) नदीम सत्तार चौधरी, जुना मुंडवा रोड प्लॉट नं.डी 2001 दुसरा मजला चंदन नगर पुणे, ४)फिरोज उर्फ फारूक इब्राहिम बागवान कराड नाका मशिदी मागे, पंढरपूर, जि. सोलापूर यांच्या विरोधात अकलूज पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1960 कलम 420 ,406, 34, 506, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे.
गुन्ह्यतील हकीगत अशी, तक्रारदार महादेव विश्वासराव तोरसकर उर्फ पिनू तोरसकर रा. माळेवाडी, कॉलेज पाठीमागे, माळेवाडी, अकलूज, ता. माळशिरस यांचा शेती व वाहन धंदा यावर कुटुंबाची उपजीविका चालत असते. त्याच गावातील नासिर उर्फ सलमान नदिन चौधरी, इमरान नदीम चौधरी, नदीम सत्तार चौधरी रा. माळेवाडी अकलूज व नदीम चौधरी यांचा मेहुना फिरोज उर्फ फारूक इब्राहिम बागवान रा. अकबर अली नगर, पंढरपूर, ता. पंढरपूर, हे शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करतात. चौधरी यांचे अकलूज शहरात डुड्डू सराफ यांचे दुकानाच्या पाठीमागे बुल कॅपिटल नावाने मोठे ऑफिस आहे. त्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करीत आहेत. पिनू तोरसकर यांना यांच्या चांगल्या ओळखीचे असल्याने दिवाळी सणानिमित्त नदीम चौधरी फराळ खाण्यासाठी आले असता नदीम चौधरी यांच्या सोबत नासिर चौधरी, इमरान चौधरी व मेहुना बागवान सर्वजण घरी आल्यानंतर त्यांनी बुल कॅपिटल या शेअर मार्केटिंग करणाऱ्या कंपनीचा महाराष्ट्रातील कंपनीचा अधिकृत प्रोप्रायटर असल्याचे सांगून त्यांनी बुल कॅपिटल या कंपनीची भारतात असलेल्या विविध ठिकाणच्या स्थावर मालमत्ता आंतरराष्ट्रीय कंपन्यातील गुंतवणूक तसेच बुल कॅपिटल मार्केटची माहिती देऊन कंपनीमध्ये पैसे गुंतवण्याचे अमित दाखवले. तोरसकर यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा त्यांना मालमत्ता किंवा सोने तारण ठेवून तुम्हाला पैसे देतो असे सांगून अकलूज येथील डुडू सराफच्या इमारतीमधील बुल कॅपिटलच्या आलिशान ऑफिसवर घेऊन जाऊन वेळोवेळी आम्ही तक्रारदार यांनी 15 एप्रिल 2023 रोजी रोख 06 लाख रुपये व घरातील 25 तोळे सोने देऊन नदीम चौधरी यांचे मेहुणे फिरोज उर्फ फारूक इब्राहिम बागवान यांना देऊन त्यांच्याकडून बारा लाख रुपये घेतले ते सर्व मिळून 18 लाख रुपये शेअर मार्केटिंग मध्ये गुंतवणूक करण्याकरता दिलेले होते. सुरुवातीस परतावा ठरल्याप्रमाणे दिलेला होता. त्यामुळे पुन्हा रक्कम व वेळोवेळी बँक खात्यातून त्यांच्या नावे रक्कम टाकलेली होती. सुरुवातीस 90 हजार रुपये प्रमाणे तीन महिन्याचे 02 लाख 70 हजार रुपये एवढेच परत दिले. वार्षिक परतावा न मिळाल्याने त्यांना समक्ष भेटल्यानंतर त्यांनी पैसे पुण्यामध्ये सापडलेले असून ते पैसे परत मिळणार आहेत. सर्वांना वार्षिक परतावा दिला जाईल असे सांगितले मात्र, उडवा उडवीची उत्तरे वारंवार दिली जात होती. 64 लाखांपैकी 61 लाख 30 हजार रुपयाची फसवणूक झालेली आहे. उलट शिवीगाळ व दमदाटी केलेली आहे. माझ्या प्रमाणे माझे ओळखीचे अजित तोरसकर, चैतन्य तोरसकर, गजानन बनसोडे, अशपाक बागवान, ओंकार वाघमारे, राहुल जाधव, प्रसाद निंबाळकर, संजय सुरवसे यांचेही पैसे त्यांनी घेऊन फसवणूक केलेली आहे.
अशा प्रकारे अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झालेले आहे. अकलूज पोलीस स्टेशन सदर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.