राहून राहून आठवण येते सर्वसामान्य जनतेला, आमदार राम सातपुते यांच्या विकास कामांची व आरोग्य सेवेची…

नेते गेले खाऊन ढुंगणाला हात पुसून, जनता मात्र कमळाचे बटन दाबायला बसली ठासून…
माळशिरस (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार आणि सोलापूर लोकसभेचे भावी खासदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात केलेली विकासकामे व सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची आरोग्य सेवेची केलेल्या कामांची राहून राहून आठवण येत आहे. सर्वसामान्य जनतेला आमदार राम सातपुते यांच्या विकास कामांना व आरोग्य सेवेला सर्वसामान्य जनता विसरलेली नाही. विकास कामांचा मलिदा नेते गेले खाऊन ढुंगणाला हात पुसून, मात्र जनता कमळाचे बटन दाबायला बसली ठासून…, असे चित्र माळशिरस तालुक्यातील माढा लोकसभेच्या निवडणुकीत पाहावयास मिळत आहे.
माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विविध योजनेतून विकास कामांसाठी भरघोस निधी आणून दमदार आमदार अशी ओळख निर्माण केलेली होती. गोरगरीब व सर्वसामान्य लोकांची शरीरातील कोणताच अवयव राहिलेला नसावा अशा प्रकारे अडचणीतील लोकांची मोफत ऑपरेशन करून आरोग्यदूत अशी उपाधी गोरगरीब जनतेच्या तोंडामधून येत होती. असे लोकप्रिय दमदार आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात गावागावात व वाड्या वस्तीवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेतून भरघोस निधी आणून माळशिरस तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केलेले आहे. माळशिरस व नातेपुते नगरपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणलेला आहे. आमदार राम सातपुते यांनी विकास निधीचे वाटप व आरोग्याची सेवा करीत असताना जात, धर्म, पंथ, पक्ष, गटतट न पाहता सरसकट तमाम जनतेची सेवा केलेली आहे.
माळशिरस तालुक्यात काम करीत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष वाढविण्याचे काम केलेले आहे. सध्या सोलापूर लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांना पुरेसा वेळ भेटलेला नाही. तरीसुद्धा उपकार असणाऱ्या नेत्यांना फोन सुरू आहेत. मात्र, ज्याच्या रक्तात गद्दारी व अपकार आहे, त्या नेत्यांनी विकास कामांचा मलिदा कोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत खाऊन गेले. ढुंगणाला हात पुसून मात्र केलेल्या उपकाराची जाण असणारी जनता मात्र पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे चिन्ह असलेले कमळाचे बटन दाबायला बसली ठासून, अशी माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय अवस्था निर्माण झालेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.