भाजपनंतर काँग्रेसचाही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाला विरोध – शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील

पंढरपूर (बारामती झटका)
प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आरक्षणावर भूमिका जाणून घेण्यात येत आहे. काल मराठा सेवक करण गायकर आणि इतर मराठा सेवकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांची मुंबईत भेट घेतली. मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसीतून आरक्षणास आपला पाठिंबा आहे का ?, असा स्पष्ट प्रश्न केला. यावर, जातीय जनगणना करावी,५०%ची मर्यादा उठवावी, अशी उडवाउडवीची उत्तरे नाना पटोले यांनी दिली.
खरे तर महाराष्ट्रात बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या काही पक्षांना मराठ्यांमुळे पुनर्जीवन मिळाले. त्यात काँग्रेसही आहे. असे असताना ५०% च्या आतील ओबीसी आरक्षणावर नाना पटोले यांनी एक शब्दही उच्चारला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, सर्व राजकीय पक्षांचा डोळा मराठा मतांवर आहे. पण, समाजाला न्याय मात्र द्यायचा नाही.

लवकरच इतर पक्षाची भूमिका जाणून घेऊन त्यांचे खरे चेहरे समाजासमोर आणले जातील. असे स्पष्ट दिसून आली आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देऊया, असे आव्हान शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.