श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या माळशिरस तालुक्यातील पहिल्या गोल रिंगणाकडे पालकमंत्री यांनी पाठ फिरवली..
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फक्त रोड शोवर भाविक व स्थानिक नागरिक यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट..
सदाशिवनगर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे महसूल दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पहिल्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगणाकडे पाठ फिरवली असल्याने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फक्त रोडशोवर भाविक, वैष्णव व स्थानिक नागरिक यांच्यामधून तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गाचा दौरा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार दि. ८ जून २०२३ रोजी आयोजित केले होता.. सकाळी पुणे, सातारा जिल्हा दौरा करून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरून पंढरपूरकडे जाणार होते. दोन दिवस दौऱ्याचे नियोजन असल्याने प्रशासन सतर्क राहिलेले होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नातेपुते पालखी मुक्काम भेट देऊन पालखी महामार्गावरील माळशिरस तालुक्यातील माऊलींचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे, सदाशिवनगर येथे भेट देणार होते. पुरंदावडे सदाशिवनगर ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक नागरिक यांनी भर उन्हामध्ये जय्यत तयारी केलेली होती. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माऊलींच्या पहिल्या गोल रिंगणात पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचा फक्त रोड शो झाला, अशी भाविक व स्थानिक नागरिक यांच्या मधून संतप्त तीव्र भावना येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng