बारामती येथे ४८ लाखाचा गुटखा पकडला, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हा अन्वेष विभागाची दमदार कामगिरी..
सुप्रसिद्ध गुटका माफिया प्रशांत गांधी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात, सोबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती (बारामती झटका)
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हा अन्वेष विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथे 48 लाखाचा हिरा पान मसाला व रॉयल 717 गुटख्याचा माल जप्त करून बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार अभिजीत दत्तात्रेय एकशिंगे यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 224 20 23 भारतीय दंड विधान कलम 394 34 अन्वय दादा उर्फ नारायण रमेश पिसाळ रा. प्रगतीनगर क्रिएटिव्ह अकॅडमी बारामती, जि. पुणे, शरद सोनवणे सांगोला, जि. सोलापूर, प्रशांत गांधी रा. बारामती, जि. पुणे, यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 कलम 338 ,188,273, 272, 34, अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 कलम 26(2)( i ),27(3)( d ),27(3)( e ),26(2)( iv )30(2)( a )59( iii) अन्वये गुन्हा नोंद करून सदरचा जप्त केलेल्या माल श्रीमती शु. जी. कर्णे अन्नसुरक्षा अधिकारी यांच्याकडे दोन पंच यांचे साह्याने कागदी सिले लावून देण्यात आलेले आहे.
घडलेली हकीगत अशी, स्थानिक गुन्हा शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती बारामती एमआयडीसी परिसरामध्ये चौधरी वस्ती रोडच्या कडेला चॉकलेटी रंगाचा पांढरे पट्टे असलेला सहा टायर आयशर टेम्पो एम एच 10 सी आर 57 94 सुगंधी गुटखा भरून उभा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस स्टाफ जाऊन खात्री केली असता चालक दादा उर्फ नारायण रमेश पिसाळ, रा. प्रगतीनगर, ता. बारामती याने वाहन लावून गेटमधून आत गेलेले होते. पोलिसांनी ताडपत्री वर करून पाहिल्यानंतर सुगंधी गुटख्याचा वास येत होता. सदर वाहन चालक याची माहिती काढून त्यास ताब्यात घेतले. सदर वाहन चालकाचे नाव दादा उर्फ नारायण रमेश पिसाळ वय 34 वर्ष, सध्या रा. प्रगतीनगर, क्रिएटिव्ह अकॅडमी जवळ, बारामती, मूळ राहणार काटेवाडी, शिवाजीनगर, ता. बारामती, येथील आहे. सदरच्या वाहनाबद्दल विचारणा केली असता सुगंधी पान मसाला गुटखा असल्याचे सांगितले. सदरचा माल हा शरद सोनवणे रा. सांगोला, जि. सोलापूर यांचे सांगणेवरून कर्नाटक येथून घेऊन आलो आहे. सदर वाहन पुढील विक्रीसाठी प्रशांत गांधी यांचे गोडाऊन जवळ लावण्यासाठी शरद सोनवणे यांनी सांगितलेले होते. त्यामुळे सदरच्या कारवाईमध्ये तिघांवर गुन्हा नोंद केलेला आहे.
प्रशांत गांधी गुटखा माफिया म्हणून विभागांमध्ये सुपरीचित आहेत. अन्नसुरक्षा अधिकारी यांना पाठीशी घालत असतात. काही अधिकारी यांच्या समवेत प्रशांत गांधी यांचे सलोख्याचे संबंध आहेत. काही दिवसापूर्वी हडपसर पोलीस स्टेशन येथे पावणेचार कोटी रुपयाची रोख रक्कम घेऊन जाताना प्रशांत गांधी यांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर कारवाई केलेली होती. पैशासाठी वापरलेली ब्रिजा कार गाडी हे अन्न व सुरक्षा अधिकारी पुणे विभागास भरारी पथकास कार्यरत असणारे अशोक इलागेर यांच्या नावावर आहे. तर, कोट्यावधी रुपयाच्या गुटखा कारवाईमध्ये पंढरपूर तालुक्याचे अन्न व सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्यावर कारवाई झालेली होती. अन्न व सुरक्षा खात्यातील अशोक इलागेर, प्रशांत कुचेकर यांच्यासह अनेकांचे लागेबंधे प्रशांत गांधी यांचे आहेत. अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी जप्त केलेला माल नष्ट न करता प्रशांत गांधी यांच्यामार्फत पुन्हा बाजारात विकला जातो, अशी ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने प्रशांत गांधी यांची व संबंधित अन्नसुरक्षा अधिकारी यांची कसून चौकशी करावी अशी सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng