फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात चुरशीच्या निवडणुकीत सचिन विजयाचा षटकार मारणार…

फलटण (बारामती झटका)
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत संभाव्य उमेदवार सचिन विजयाचा षटकार मारणार, अशी राजकीय परिस्थिती फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाची झालेली आहे.
पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून सचिन सुधाकर कांबळे पाटील यांची फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात सध्या चर्चा सुरू आहे. कांबळे पाटील घराण्याची पूर्वीपासून भारतीय जनता पार्टी व संघ परिवार यांच्याशी नाळ जोडलेली आहे.
सुधाकर कांबळे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सातारा जिल्हा प्रचारक म्हणून काम केलेले आहे. सध्या सचिन कांबळे पाटील फलटण-कोरेगाव भाजपचे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. ते पदवीधर आहेत.

लहानपणापासून पाणीदार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करीत असत. खासदार यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे सचिन कांबळे पाटील वर्गमित्र आहेत. नाईक निंबाळकर व कांबळे-पाटील यांचे राजकीय ऋणानुबंध आहेत. सचिन कांबळे पाटील खाटीक धनगर समाजाचे आहेत. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात धनगर समाज बांधवांची मतदानाची आकडेवारी विजयाकडे खेचून नेण्याइतपत आहे. सध्या फलटण-कोरेगाव मतदार संघातील प्रस्थापितांना कंटाळून अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद दादा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हातात हात घालून राजकीय वाटचाल सुरू केली आहे. महायुतीमध्ये असणारे दगाबाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट सोडून जात असल्याने सचिन कांबळे पाटील यांच्या निवडणुकीसाठी मैदान मोकळे राहणार आहे. यंदाच्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदारकीच्या कार्यकालामध्ये फलटण कोरेगाव मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. जाणीवपूर्वक विकासापासून कोसो दूर ठेवलेल्या सर्वसामान्य व पिढीत नागरिकांना न्याय देण्याची भूमिका पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी ठेवलेली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत फलटण कोरेगाव मतदार संघ निश्चितपणे परिवर्तन करून महायुतीचे अधिकृत संभाव्य उमेदवार सचिन कांबळे पाटील विजयाचा षटकार मारणारच, असे फलटण कोरेगाव मतदार संघातील जनतेमधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.