पै. नवनाथ हनुमंत काळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन….

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथील पैलवान नवनाथ हनुमंत काळे यांचे वयाच्या 37 व्या वर्षी शनिवार दि. 25/05/2024 रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व लहान मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात बजरंग वस्ती, काळे वस्ती, माळशिरस या ठिकाणी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.
पैलवान नवनाथ हनुमंत काळे हे नामांकित पैलवान होते. त्यांना लहानपणापासून बैलगाडी शर्यतीचा नाद होता. त्यांच्या घरामध्ये सुप्रसिद्ध अशी बैलगाडी शर्यतीमधील बैलजोडी आहेत. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. समाजामध्ये त्यांची चांगली प्रतिमा होती. अचानक दुःखद निधन झाल्याने काळे परिवार व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
मृतात्म्यास शांती लाभो व काळे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे. सोमवार दि. 27/05/2024 रोजी सकाळी 07 वाजता काळे वस्ती, माळशिरस येथे रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा) कार्यक्रम होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.