अकलूजसह महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.
कृषी उत्पन्न बाजार समितीची संभाव्य मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला
अकलूज ( बारामती झटका )
महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. बाजार समितीच्या संभाव्य मतदार यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागविण्यास दि. 27/09/2022 पर्यंत मुदत आहे.



जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दि. 14/11/2022 आहे. अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दि. 07/12/2022 आहे. निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक कार्यक्रम दि. 23/12/2022 रोजी जाहीर करून दि. 29/12/ 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारतील. मतदान दि. 29/01/2023 रोजी असून मतमोजणी दि. 30/01/2023 रोजी असणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

