अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या महाराष्ट्र राज्यव्यापी महाअधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत संपन्न होणार – बाळासाहेब सरगर
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्रमध्ये गेली अनेक वर्ष विकासकामांपासून कोसोदुर असणारा होलार समाज यांच्यावतीने तहसील कार्यालय माळशिरस या ठिकाणी एक दिवशीय धरणे आंदोलन व हलगीनाथ आंदोलन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला नंदकुमार केंगार राज्य अध्यक्ष होलार समाज संघटना, सुनील ढोबळे जिल्हा उपाध्यक्ष, गणेश केंगार तालुकाध्यक्ष, केंगार महाराज, समाजभूषण पांडुरंग नामदास, रणजीत नामदास नामदेव, केंगार शेलार सर आदी समाज बांधव उपस्थित होते.


या मोर्चाला माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, किसान मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, डॉ. कुमार लोंढे, ओबीसी मोर्चा माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, ॲड. वैभव गीते, बंडखोर साप्ताहिकाचे संपादक गौतम भंडारे, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब सरगर म्हणाले की, या समाजाच्या प्रश्नासाठी माळशिरस तालुक्यामध्ये होलार समाज संघटनेच्या वतीने राज्यव्यापी महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निमंत्रित करण्याबाबत माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यासमवेत होलार समाज संघटनेची बैठक होऊन त्यामध्ये जे तालुका लेव्हलची प्रश्न आहेत, त्या प्रश्नाबाबत राम सातपुते यांनी सकारात्मक सोडवण्याबाबत निर्णय घेतला आहे.
तर महामंडळ स्थापन करणे जे राज्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासमवेत व त्यांच्या कार्यालयाबरोबर आ. राम सातपुते यांचा सातत्याने संपर्क असून लवकरच तारीख कळाल्यानंतर अधिवेशनाला उपस्थिती लावतील. होलार समाजाचे प्रश्न मार्गी लागतील ते लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन बाळासाहेब सरगर यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng