ताज्या बातम्याराजकारण

सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री सोलापूरचाच असावा, अशी सोलापूर जिल्ह्याच्या जनतेची मागणी.

विधिमंडळाच्या अधिवेशनापुर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळावे

माळशिरस (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री उशिरा दोन तास विविध विषयांवर चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्तार, आगामी विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणुकीत महायुतीला कोणते मुद्दे अडचणीचे ठरले, यावर सखोल चर्चा झालेली आहे. विधिमंडळ अधिवेशन 27 जून रोजी सुरू होत आहे त्या अगोदर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महायुतीचे आमदार आहेत. यापैकी सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री सोलापूरचाच असावा अशी सोलापूर जिल्ह्याच्या जनतेची मागणी आहे.

महायुतीचा भाजप राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचा ५०:२५:२५ चा फॉर्म्युला ?
राज्य मंत्रिमंडळात सध्या २९ सदस्य आहेत. आणखी १४ जणांना संधी दिली जाऊ शकते. भाजप व शिंदे-अजित पवारांमध्ये ५०:२५:२५ टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिपदांचे वाटप केले जाऊ शकते. 14 जागांमधील भाजप 8, शिवसेना 3 व राष्ट्रवादी 3 अशी मंत्रिपदे मिळू शकतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप राम सातपुते, विजयमालक देशमुख, सुभाषबापू देशमुख, समाधान आवताडे, सचिनकल्याण शेट्टी, शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनदादा शिंदे, यशवंततात्या माने, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष संजयमामा शिंदे, भाजप पुरस्कृत अपक्ष राजाभाऊ राऊत असे महायुतीचे आमदार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात समन्वय राखणाऱ्या तरुण चेहऱ्याला संधी देऊन सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व करण्याची संधी द्यावी असे सोलापूर जिल्ह्याच्या जनतेची अपेक्षा आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button